Mazya Navryachi Bayko Fame Rasika Sunil Spoke About Her Relationship Status | 'त्या' रिलेशिपबद्दल पहिल्यांदाच बोलली रसिका सुनील, म्हणाली
'त्या' रिलेशिपबद्दल पहिल्यांदाच बोलली रसिका सुनील, म्हणाली

'माझ्या नव-याची बायको’ मालिकेमुळे घराघरात पोहचलेली शनाया म्हणजेच रसिका सुनीलने अल्पावधीतच सा-यांची मनं जिंकली होती. रसिका सुनीलनं शनाया ही भूमिका मोठ्या खुबीने साकारली होती.मात्र  रसिकाला फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी न्युयॉर्कला जायचे होते म्हणून तिने ही मालिका सोडली होती. रसिका छोट्या पडद्यावर झळकत नसली तरीही तिचे चाहते तिला विसरलेले नाहीत. सोशल मीडियावर रसिका बरीच एक्टिव्ह असते आणि वेगवेगळे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते तिच्या रिअल लाइफमध्ये काय सुरु असते हे जाणून घेण्यासाठी तितकेच उत्सुक असतात. सध्या व्हॅलेंडाइन विक सुरू आहे. म्हणून एका युजरने थेट तिला तिच्या रिलेनशिप स्टेटसबद्दल प्रश्न विचारला. इतरांप्रमाणे रसिकाने उत्तर देणे टाळले नसून त्यावर तिने सांगितले की, ‘मी सुपर सिंगल’ आहे. तिचे हे उत्तर वाचून अनेकांना आशेचा किरण दिसला असणार हे मात्र नक्की. 

काही महिन्यांपूर्वी रसिकाचा सोशल मीडियावर अकाऊंटवरील एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता. या फोटोंमध्ये रसिका आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर एकत्र पाहायला मिळाली होती. एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असो किंवा मग एकत्र सिनेमाला जाणे असो, प्रत्येक क्षणाचे फोटो रसिकाने आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केले होते. त्यामुळे रिल लाइफमध्ये  रसिका सिद्धार्थ चांदेकरवर लट्टू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

अखेर सिद्धार्थ आणि रसिका यांच्या अफेअर नसून चांगली मैत्री असल्याचे स्पष्ट झाले. नुकतेच कारण नुकताच सिद्धार्थने मिताली मयेकरसह  साखरपुडा झाला आहे. या दोघांचा चांगला मित्र सुयश टिळकनेच फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती.साखरपुडा झाला असला तरी सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही.

  


Web Title: Mazya Navryachi Bayko Fame Rasika Sunil Spoke About Her Relationship Status
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.