'Marrying nicotine ... it's got married! | ​'नकटीचं लग्न लावता लावता... त्याचंच लग्न ठरलं !

छोट्या पडद्यावरील रात्रीस खेळ चाले या मालिकेने रसिकांच्या मनात वेगळे स्थान मिळवलं होतं. या मालिकेच्या कथेसोबतच मालिकेतील पात्रंसुद्धा प्रत्येक घरातील जणू सदस्य बनले होते. प्रत्येक व्यक्तीरेखा आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे. मालिकेच्या विविध व्यक्तीरेखांपैकी एक आणि सगळ्यात लोकप्रिय ठरलेली व्यक्तीरेखा म्हणजे पांडू. रात्रीस खेळ चाले मालिकेतला हा विसरभोळा पांडू रसिकांना चांगलाच भावला होता. त्यांची बोलण्याची शैली, त्याचं वागणं सारं काही रसिकांना भावलं होतं. विशेष म्हणजे काहीही झाल्यानंतर त्याच्या ओठावरील कायता.... ईसरलंय हा डायलॉग रसिकांच्या ओठावरही सहज रुळला. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेला हा पांडू साकारला होता तो मालिकेची कथा लिहणा-या लेखक प्रल्हाद कुडतरकर याने. पांडूची प्रल्हादने साकारली भूमिका रसिक विसरलेले नाहीत. त्यामुळेच त्याच्या रियल जीवनासंदर्भातली एक खास आणि तितकीच गोड बातमी आहे. तुमच्या आमच्या सगळ्याचा लाडका पांडू आता रियल लाईफमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. अंजली कानडे हिच्याशी तो रेशीमगाठीत अडकणार आहे. येत्या मे महिन्याच्या अखेरीस दोघाचं शुभमंगल पार पडेल. नुकताच दोघांचा साखरपुडा पार पडला. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रल्हाद आणि अंजलीचा साखरपुडा संपन्न झाला. अंजली ही योगा प्रशिक्षक आहे. सध्या प्रल्हादसुद्धा छोट्या पडद्यावरील नकटीच्या लग्नाला याययं हं या मालिकेसाठी संवाद लेखन करत आहे. मात्र नकटीचं लग्न लावता लावता प्रल्हाद स्वतःच रियल लाइफमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.
Web Title: 'Marrying nicotine ... it's got married!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.