महिमा मकवाणाला अभिनयाइतकीच आवडते ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 07:15 AM2018-11-30T07:15:00+5:302018-11-30T07:15:00+5:30

अभिनेत्री महिमा मकवाणा सध्या ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत मरियम ही मुख्य भूमिका साकारते आहे.

Mariam Khan – Reporting Live fame Mahima Makwana juggling between shoot and college | महिमा मकवाणाला अभिनयाइतकीच आवडते ही गोष्ट

महिमा मकवाणाला अभिनयाइतकीच आवडते ही गोष्ट

googlenewsNext
ठळक मुद्दे‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये मुख्य भूमिकेत महिमा मकवाणामहिमा चित्रीकरणातून वेळ काढून जाते लेक्चरला

स्टार प्लस वाहिनीवरील  ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेतील आपल्या सक्षम अभिनयाने १९ वर्षांच्या महिमा मकवाणाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या मालिकेत ती मरियम ही प्रमुख भूमिका साकारीत असून त्याच्या चित्रीकरणाचे वेळापत्रक फारच दीर्घकाळ सुरू असते. पण महिमा केवळ मालिकेतच उत्तम काम करीत आहे, असे नव्हे; तर त्याचबरोबर ती आपले कॉलेज व अभ्यासही सांभाळते आहे.
महिमा सध्या बॅचलर ऑफ मास मीडिया या अभ्यासक्रमात पदवीचे शिक्षण घेत असून तिला वेळ मिळाला की ती कॉलेजमध्ये जाऊन लेक्चरही अटेंड करते. महिमाने सांगितले, मला अभिनयाइतकाच माझा हा अभ्यासक्रमही आवडतो आहे आणि मला या दोन्ही गोष्टी करायला मिळत असल्याचा आनंद वाटतो. पण कधी कधी कॉलेजातील काम आणि प्रदीर्घ काळ चालणारे चित्रीकरण यामुळे मला या दोन्ही गोष्टी सांभाळताना तारेवरची कसरतच करावी लागते.”
ती बरेचदा सेटवरच मोकळा वेळ मिळाला की आपला कॉलेजचा अभ्यास करीत असताना दिसते. आपण जी गोष्ट करू, त्यासाठी कठोर मेहनत घेण्याची महिमाची तयारी आहे मग ते शिक्षण असो की अभिनय. इतक्या लहान वयाच्या अभिनेत्रीला आपल्या कामाच्या बाबतीत असलेली निष्ठा यातून पाहायला मिळते आहे.
‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकाचे कथा भोपाळच्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे. या मालिकेत महिमा मकवाणासोबत परस सिंग, रुक्सार रेहमान यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Web Title: Mariam Khan – Reporting Live fame Mahima Makwana juggling between shoot and college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.