काय सांगता, 'सैराट' सिनेमाची आता बनणार मालिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 04:20 PM2019-02-15T16:20:03+5:302019-02-15T16:22:33+5:30

'सैराट'मध्ये परशासोबत आर्चीची रोमँटिक केमिस्ट्री, तिचा तितकाच बेधडक अंदाज, बुलेटच नाही तर ट्रॅक्टरही लिलया चालवणं सारं काही रसिकांवर जादू करुन गेलं.अगदी अशाचप्रकारची कलाकारांचा संध्या शोध घेतला जात आहे.

Marathi Sairat Movie Now Tv Adaption | काय सांगता, 'सैराट' सिनेमाची आता बनणार मालिका?

काय सांगता, 'सैराट' सिनेमाची आता बनणार मालिका?

googlenewsNext

मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा म्हणजे 'सैराट'.  नागराज मंजुळेच्यासैराट सिनेमाने मराठी रसिकांसह बॉलीवुडवरही जादू केली होती. नागराजचे सा-यांनीच कौतुक केले होते. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले. रसिकांप्रमाणेच सैराटची भुरळ बॉलीवुडलाही पडली. त्यामुळे बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरने सैराटचा रिमेक बनवण्याचं ठरवलं आणि धडक हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला. आजही 'सैराट' सिनेमाची जादू कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.आता पुन्हा सैराटचे आणखीन एक व्हर्जन रसिकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा आहे. सैराट सिनेमा आता घरबसल्या रसिकांना अनुभवता येणार आहे. होय, सिनेमावर आधारित मालिका रसिकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा आहेत. 


सैराटवर बनवण्यात येणा-या मालिकेची स्टारकास्टही फिक्स करण्यात आल्याचे समजतंय. त्यानुसार  टीव्ही अभिनेता कमल नारायण राजवंशी या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या बोलले जात आहे.  तर मालिकेत रिंकुने साकारलेली आर्ची आणि आकाश ठोसरने साकारलेली परश्या भूमिकेसाठी नवीन चेह-यांच्या शोधात असल्याचे समजतंय. 'सैराट'मध्ये परशासोबत आर्चीची रोमँटिक केमिस्ट्री, तिचा तितकाच बेधडक अंदाज, बुलेटच नाही तर ट्रॅक्टरही लिलया चालवणं सारं काही रसिकांवर जादू करुन गेलं.अगदी अशाचप्रकारची कलाकारांचा संध्या शोध घेतला जात आहे. तुर्तास मालिकेविषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सैराटची बॉलिवूडवारी नंतर छोटा पडदापर्यंतचा प्रवास हा नक्कीच एक मनोरंजनाची पर्वणी देणारा ठरणार हे मात्र नक्की. 

Web Title: Marathi Sairat Movie Now Tv Adaption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.