अशी साजरी करणार मराठी कलाकार आपली दिवाळी...जाणून घेण्यासाठी क्लिक करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 12:19 PM2018-11-01T12:19:32+5:302018-11-01T12:37:01+5:30

सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा दिवाळी सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतात. ते ही मोठ्या उत्साहाने दिवाळी सेलिब्रेट करतात

Marathi actors will celebrate their diwali like this... click to know! | अशी साजरी करणार मराठी कलाकार आपली दिवाळी...जाणून घेण्यासाठी क्लिक करा!

अशी साजरी करणार मराठी कलाकार आपली दिवाळी...जाणून घेण्यासाठी क्लिक करा!

googlenewsNext

सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा दिवाळी सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतात. ते ही मोठ्या उत्साहाने दिवाळी सेलिब्रेट करतात.  छोट्या पडद्यावरीव कलाकार दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

भाग्यश्री लिमये – घाडगे & सून 

दिवाळी म्हणजे दीपोत्सव, आनंदोत्सव आणि माझ्यासातही तर खूपच खास... कारण शुटींग मुळे मी घरापासून दूर आहे. पण दिवाळीच्या निमित्ताने मला दोन तीन दिवस तरी घरी जायला मिळते. मग मी आईच्या हातची चकली, चिवडा मनसोक्त खाते. तिकडे गेले कि, एक कार्यक्रम आम्ही नक्की करतो आणि तो म्हणजे शाळा आणि कॉलेजच्या मित्र मैत्रीण यांना भेटणे... त्यावेळेसच्या गमती जमती, स्वत: बनवलेले ग्रीटिंग कार्ड्स शिक्षकांना देणे. एकमेकांच्या घराच्या फराळाचा आस्वाद घेणे... दिवाळीच्या मजा लुटत असताना सामाजिक तेचही भान राखणे अत्यंत महत्वाचे आहे... फटाके फोडून हवा प्रदूषित होते... लहान मुलं, प्राणी आवाजाला खूप घाबरतात ... काहींना शारीरिक इजाही होऊ शकते... त्यामुळे हे सगळं टाळूया ... आणि ही दिवाळी फटाके विरहीत साजरी करून मंगलमय दीपोत्सवचं स्वागत करुया...

 

चिन्मय उदगीरकर – घाडगे & सून

 यंदाच्या दिवाळी मध्ये मी चकली बबनविण्याचा प्रयत्न करणार आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे... अंधकार दूर करून प्रकाशाचं साम्राज्य पसरवण्याचा हा सण आहे... हा जो ज्ञानाचा दीप आहे ... दिवा आहे... ही दिवाळी आता आपण आपल्या आत साजरी करुया... म्हणजेच ज्या लोकांसोबत आपलं पटत नाही, ज्यांचा आपल्याला राग येतो त्यांना आपण माफ करुया...आपल्या मनात त्यांच्याविषयी असलेला अंधार दुर करुया... त्यामुळे जो पहिला दिवा आहे तो आपण आपल्या मनात लावूया... यंदाची दिवाळीसुध्दा मी माझ्या घरच्यांसोबत साजरी करणार आहे... यंदाच्या दिवाळी मध्ये मी चकली बबनविण्याचा प्रयत्न करणार आहे... लहानपणीची आठवण सांगायची झाली तर, नरकचतुर्दशीच्या दिवशी जर सूर्योदयापूर्वी उठल नाहीतर नरकात जातो ... तर लवकर जर उठलो तर स्वर्गात जायला मिळेल, चंद्रनगरी बघायला मिळेल म्हणून माझ्या भावामध्ये आणि माझ्यात स्पर्धा लागायची कोण लवकर उठेल... लहानपणीच्या खोड्या या मोठ्यापणीच्या गोड आठवणी होतात हे नक्की”...

 

शशांक केतकर – सुखाच्या सरींनी हे मन बावरे

“मी १९९४ पासून फटके उडवण बंद केले आहे. सण साजरे करण ही वेगळी संस्कृती आहे आपल्याकडे... कुठलाही सण वेगळ्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे...त्याचं व्यावसायिकीकरण करता कामा नये ... दु:खद गोष्ट आहे कि, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा व्यवसाय होतो... त्यामुळेच माझा फटाके उडवायला विरोध आहे...आता बऱ्यापैकी प्रमाण कमी झालं आहे...रत्यावरचा कचरा वाढवून, घाण करून, वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण करून कुठलाही सण साजरा होत नाही... कापसाचे दिवे, पणत्या लावून, कागदाचे आकाशकंदील लावून आपण दिवाळी साजरी करुया... आपण बदलो आहोत, नवीन पिढी बदलत आहे, आपण सुजाण झालो आहोत हे आपण यातूनच दाखवून देऊ शकतो”.

 

मृणाल दुसानिस - सुखाच्या सरींनी हे मन बावरे

माझ्यासाठी दिवाळी कायमच खास असते कारण म्हणजे त्यात असणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईमुळे ... लहानपणी दिवाळी आली कि, एका गोष्टीची भीती वाटायची आणि ते म्हणजे सुट्टीमध्ये मिळालेल्या गृहपाठाची... आता दिवाळी साजरी करण्याचे स्वरूप खूपच बदलेले आहे... मी इतकच सांगेन कि, ध्वनिप्रदूषण होईल, शारीरिक ईजा होईल असे फटाके उडवू नका...

 

समृद्धी केळकर – लक्ष्मी सदैव मंगलम्

लहानपणापासून मी दिवाळीची आतुरतेने वाट पाहते कारण त्यावेळेस याची कारणे जरा वेगळी होती. मला पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी करायला खूप आवडते. आपण प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करून आनंद व्यक्त करू शकतो. गणपती, नवरात्री आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा सण येतो तो म्हणजे दिवाळी ... मी लहानपणापासून स्वत: हाताने बनवलेला कंदील लावून साजरी केली आहे. लहानपणी आम्ही गावी जायचो तेंव्हा मोठी रांगोळी, कंदील लावून साजरे करायचो. मी ठाण्याची असल्याने त्यामुळे राम मारती रोड, तळावपाली येथे पहिल्या दिवशी खूप गर्दी असते ... ते वातावरण खूप आनंदमय असत...

Web Title: Marathi actors will celebrate their diwali like this... click to know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.