बिग बॉस 11 सिझनमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेची एंट्री होताच शिल्पाने ती मराठी मुलगी असल्याचे इतरांनाही दाखवून दिले आहे. घरात होणारे वाद विवाद यामुळे  बिग बॉसचे सगळेच पर्व चर्चेत राहिले आहेत. या पर्वातही त्या सगळ्या गोष्टी घडल्याचे पाहायला मिळत आहे. जेव्हा जेव्हा कोणत्या गोष्टीचा शिल्पाला समोरे जावे लागते तेव्हा ती मराठी मुलगी असल्याचे सांगत बिनधास्तपणे त्या गोष्टींना शाब्दिक लढा देताना दिसते.मराठी तिचा बाणा... मराठी तिची बोली... म्हणून मराठी रसिकांनाही बिग बॉसच्या घरातली ही  मराठी मुलगी चांगलीच भावली...तसेच मराठी अभिनेत्रीने हिंदी शोमध्ये दाखवलेला मराठी बाणा हा काही नवीन नाहीय. यापूर्वीही अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदी टीव्ही शोमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.या मराठमोळ्या अभिनेत्रींचा प्रत्येक अंदाज रसिकांनी डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले.कधी बनली लाडकी लेक बनत  तर कधी पत्नी. तर  कधी सून... तर कधी सासू.. तर कधी बहिण... तिचं प्रत्येक रुप, प्रत्येक भूमिका त्यांची हिंदीत रसिकांनी डोक्यावर घेतली...त्यांचा अदाकारी, त्यांची भूमिका हिंदी रसिकांनी अशी काही डोक्यावर घेतलीय की प्रत्येक घराघरातल्या त्या अविभाज्य अंग बनल्या...आम्ही बोलतोय... छोट्या पडद्यावरच्या आघाडीच्या नायिकांबद्दल... या सगळ्या नायिकांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती  म्हणजे सगळ्याच जणी हिंदी भाषिक नसून मराठमोळ्या होत्या.


गौरी प्रधान
जरा हेच पहा... 'कुटुंब', 'क्योंकी सास भी कभी बहूँ थी ', 'कुमकुम'सारख्या अनेक मालिका गाजवणारी ही गौरी प्रधान... मराठमोळ्या गौरीचा अभिनय रसिकांना चांगलाच भावला...

अंकिता लोखंडेआजही रसिक छोट्या पडद्यावरची अर्चनाला विसरलेले नाहीत.अर्चना हे नाव आजही घराघरात प्रत्येकांच्या तोंडावर सहज येतं.. हेच नाव आपल्या भूमिकेतून प्रसिद्ध करणारी ही तनुजा अर्थात अंकिता लोखंडे.. 'पवित्र रिश्ता'मधला तिचा अभिनय सा-यांना असा काही भावला की ती मराठमोळी मुलगी आहे याचा कुणालाच विश्वास बसला नाही...


माधवी गोगटेमिसेस तेंडुलकर, बसेरा, कहीं तो होगा, कोई अपना सा सारख्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी माधवी गोगटेसुद्धा मराठमोळीच....

 प्रिया मराठे कसम से, पवित्र रिश्ता, बडे अच्छे लगते है, साथ निभाना साथियाँ  या मालिकांमधून प्रिया मराठे या मराठी मुलीनं रसिकांची मनं जिंकलीत...

मानसी साळवी


कोई अपना सा, सारथी, सती, मिठा मिठा प्यारा प्यारा सारख्या एकाहून सरस आणि दमदार मालिकांमधल्या भूमिकेने मानसी साळवी या मराठी नायिकेनं रसिकांच्या मनावर गारुड घातलंय...

क्षिती जोगसुद्धा घर की लक्ष्मी बेटियॉं, आप की अंतरा, साराभाई वर्सेस साराभाई, नाव्या मधली ही क्षिती तर तुम्हाला चांगलीच माहिती... हीच क्षिती जोगसुद्धा मराठमोळी...सध्या ती ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे.


पल्लवी सुभाष गोद भराई, बसेरा, आठवा वचन, तुम्हारी दिशा सारख्या मालिकांमधून पल्लवी सुभाष हे मराठी नावही घराघरात गाजतंय...

राजश्री ठाकूरसात फेरे आणि भारत का वीर पुत्र महाराणा प्रतापमधली राजश्री ठाकूरसुद्धा मराठमोळी नायिकाच...एकूणच काय तर हिंदीतला छोटा पडदा मराठमोळ्या नायिकांनी व्यापून टाकलाय... हिंदीतल्या एका प्रसिद्ध गाण्यांच्या ओळींप्रमाणे... ये मराठी कूडियों का है जमाना......

Web Title: Marathi actors get to see Hindi bahasa
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.