Mandira Bedi hit the Pump Ups at the Triumph fashion show 2018 Ramp | ​मंदिरा बेदीने ट्रायम्फ फॅशन शो २०१८ च्या रॅम्पवरच मारले पुश अप्स

टीव्ही जगतातली 'फिटनेस फ्रिक' आणि बोल्ड अभिनेत्री मंदिरा बेदी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. नुकत्याच ट्रायम्फ फॅशन शो २०१८ च्या रॅम्पवर मंदिरा दिसली. या रॅम्पवर मंदिरा फक्त चाललीच नाही तर तिने रॅम्पवरच पुश अप्स मारले. ४६ वर्षीय मंदिराचा हा अवतार बघून समोर बसलेल्या प्रेक्षकांनी एकच कल्ला केला आणि टाळ्या वाजवून तिचे कौतुक केले. याविषयी मंदिरा सांगते, 'खेळावर माझे प्रेम आहे आणि माझ्या आयुष्यात फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी नेहमीच माझ्या दिवसातील जास्तीत जास्त वेळ हा व्यायामासाठी देते. 
मंदिराने अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने छोट्या पडद्यावरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९९४ साली आलेल्या 'शांती' या कार्यक्रमामुळे मंदिरा बेदीला खूपच प्रसिद्धी मिळाली. लोकांच्या घरात ती शांती म्हणूनच ओळखली जाऊ लागली. यानंतर शाहरुख खान आणि काजलसोबत ती 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमातही दिसली होती. चित्रपटात ती पंजाबमधील एका लाजाळू मुलीची भूमिका साकारताना दिसली. तेव्हापासून आतापर्यंत मंदिराच्या रूपात कुठलाही बदल झाल्याचे जाणवत नाही. मंदिराने आता ट्रायम्फ फॅशन शोच्या रॅम्पवर पुश अप्स मारले. याआधी तर तिने साडीत पुश अप्स मारल्यामुळे ती चर्चेत आली होती. मंदिराचे स्टाइल स्टेटमेंट सर्वात वेगळे आणि हटके आहे. त्यामुळे मंदिरा ज्या ठिकाणी जाते त्याठिकाणी तिचा अंदाज बघण्यासारखा असतो. मंदिरा आपल्या लाइफमध्ये फिटनेसला खूप महत्त्व देते. त्यामुळेच वयाच्या ४६व्या वर्षीही मंदिरा फिट असल्याचे दिसून येते. मंदिरा आता चित्रपट, मालिकांमध्ये कमी दिसत असली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आता ती ‘साहो’ या चित्रपटात निगेटीव्ह भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटात सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रचंड आतुरता आहे. बऱ्याच काळानंतरही मंदिरा या बिग बजेट चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Also Read : कास्टिंग काउचवर मंदिरा बेदीने म्हटले, ‘टाळी एका हाताने वाजत नाही’!  


Web Title: Mandira Bedi hit the Pump Ups at the Triumph fashion show 2018 Ramp
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.