Manasi is married in real life | मानसी रिअल लाईफमध्ये आहे विवाहित

खुलता कळी खुलेना या मालिकेने फार कमी वेळेत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतील मोनिका-विक्रांत-मानसी या तीन प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांचे मनदेखील जिंकले आहेत. मोनिका ही निगेटिव्ह भूमिकेत ही प्रेक्षकांमध्ये हिट ठरत आहेत. तर मानसी आणि विक्रांत यांच्या भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. मात्र मानसीची विशेष भूमिका प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. कारण ती अतिशय सोज्वळ रुपात पडद्यावर झळकत आहे. त्यामुळे ती अधिक प्रेक्षकांना भावत आहे. मानसीचे रिअल लाइफमधील नाव आहे मयुरी देशमुख . मयुरीच्या रिअल लाइफविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक असणार हे मात्र नक्की. मालिकेत जरी मानसीच्या जीवनसाथीच्या  शोधात सर्व असले तरी रियल लाइफमध्ये मात्र मानसी विवाहीत आहे. ती याचवर्षी विवाहबंधनात अडकली आहे. फेब्रुवारी महिन्यात तिचे लग्न झाले आहे. आशुतोष भाकरे असे तिच्या जोडीदाराचे नाव आहे. आशुतोष हा तीन मराठी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. इचार ठरला पक्का, बायको असावी अशी आणि भाकर या सिनेमांमध्ये आशुतोषने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे आशुतोषची मध्यवर्ती भूमिका असलेल्या भाकर या सिनेमाचे कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमिअर झाला होता. आता आशुतोष 'ब्लँकेट' या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. आशुतोष मुळचा नांदेडचा आहे. वयाच्या २५ व्या वर्षी मानसी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. मयुरी ही 'प्लेझंट सरप्राईज' या व्यावसायिक नाटकात सौरभ गोखले आणि प्राजक्ता माळीसोबत ती झळकली आहे. 'खुलता कळी खुलेना' या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली आणि आता मयुरी घराघरांत लोकप्रिय झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मयुरी एका लहान भूमिकेत रुपेरी पडद्यावरसुद्धा झळकली आहे. 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या सिनेमात मयुरीने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. 

्न
Web Title: Manasi is married in real life
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.