ममता आणि मौजी येतायेत प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 04:56 PM2018-12-14T16:56:15+5:302018-12-14T17:01:00+5:30

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे नेहमी एक स्त्री असते. त्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या कामात ती त्याला अखंड साथ देत असते. ही सुंदर गोष्ट तितक्याच सुंदरपणे अनुष्का शर्मा आणि वरुण धवन अभिनीत 'सुई धागा- मेड इन इंडिया' या चित्रपटात दाखवण्‍यात आली आहे.

Mamta and Maui come to meet audience | ममता आणि मौजी येतायेत प्रेक्षकांच्या भेटीला

ममता आणि मौजी येतायेत प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
ठळक मुद्देशरत कटारिया यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे,

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे नेहमी एक स्त्री असते. त्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या कामात ती त्याला अखंड साथ देत असते. ही सुंदर गोष्ट तितक्याच सुंदरपणे अनुष्का शर्मा आणि वरुण धवन अभिनीत 'सुई धागा- मेड इन इंडिया' या चित्रपटात दाखवण्‍यात आली आहे.  हा सिनेमा २२ डिसेंबर 'सुई धागा- मेड इन इंडिया' या चित्रपटाचा वर्ल्ड टेलीव्हिजन प्रिमीयर होणार आहे.

शरत कटारिया यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले असून अनुष्का शर्मा आणि वरुण धवन या कलाकारांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. जोडीला रघुवीर यादव सारखा मुरलेला अभिनेता आहे.

'सुई धागा- मेड इन इंडिया'ची कथा आहे ममता (अनुष्का शर्मा) आणि मौजी (वरुण धवन) यांची. विणकरांच्या कारागिरांच्या घरातील ही जोडी. आपल्या भोळ्या पण कुशल नवऱ्याचा त्याच्या मालकाकडून सतत होत असलेला पाणउतारा ममताला सहन होत नसतो. मालकाची गुलामी करणारी नोकरी सोडून स्वतःचा शिवणकामाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी ती मौजीला तयार करते. मौजीच्या आईला जेव्हा रुग्णालयात भरती करण्यात येते तेव्हा आपला व्यवसाय सुरु करण्यासाठीची संधी त्याच्याकडे चालून येते. एक साधी सुधी गृहिणी मौजीच्या सुई मधला धागा बनते आणि एकत्र मिळून त्याचे स्वप्न विणायला व उद्योजक बनण्याच्या त्याच्या इच्छापूर्तीला त्याला मदत करते.

वरुण धवन: “सुई धागा हा खूपच हृदयस्पर्शी चित्रपट आहे. उद्योजकतेवर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. जोडीला आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी जबर इच्छाशक्ती आणि निश्चित दृष्टीकोन हवा. भारत हा अशा लोकांचा देश आहे जिथे लोकं त्यांच्या इच्छापूर्तीसाठी अखंड प्रयत्न करत असतात आणि 'मेड इन इंडिया' हा चित्रपट नक्कीच त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायला प्रेरणा देईल. ज्या क्षणी मी या चित्रपटाची कथा ऐकली त्याच क्षणी मी हा चित्रपट करणार हे नक्की केले. या चित्रपटाच्या शूटिंगच्या संपूर्ण प्रवासात अनुष्काची मला खूपच मदत झाली.”

अनुष्का शर्मा:  “सुई धागा'मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांना माझा मनापासून पाठिंबा आहे- जसे की अथक कष्ट आणि स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी काम करण्याची तयारी. आधी मी या चित्रपटाला होकार देण्‍याच्‍या बाबतीत साशंक होती, कारण या भूमिकेला मी योग्य न्याय देऊ शकेन का याची मला काळजी वाटत होती. पण मी संपूर्ण चित्रीकरणादरम्‍यान याचा आनंद घेतला. सुई धागा ही एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या जीवनामागील हेतू शोधण्‍याची कथा आहे.”

Web Title: Mamta and Maui come to meet audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.