Mallika Duaane told the trollers | मल्लिका दुआने ट्रोलर्सला सुनावले
मल्लिका दुआने ट्रोलर्सला सुनावले
अनभिज्ञ ट्रोलर्सच्या विरोधात बानी जे दिलेल्या जबरदस्त मुक्केबाजीनंतर अफलातून विनोदी कलाकार मल्लिका दुआने आपल्या पद्धतीने इंटरनेटवरील द्वेषाला आपली जागा दाखवली आहे. हा ‘ट्रोल्ड’ ह्या सीरीजअंतर्गत दुसरी शॉर्ट फॉर्मेट म्युझिक व्हिडीओ असून याचा प्रीमिअर टीएलसीच्या राईजवर होईल। हा स्त्रियांनी स्त्रियांसाठी बनवलेला पहिला डिजिटलफर्स्ट चॅनल आहे. मल्लिका दुआ ही डिजिटल डोमेनमधील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. पण जेव्हापासून तिने प्रकाशझोतात पाऊल टाकले आहे, तिला टिंडर आंटी म्हणून हिणवले गेले आहे आणि तिच्या शरीराबद्दल ट्रोलिंग केले गेले आहे. आता, मल्लिकाने ह्या सायबरबुलीज्‌ना सडेतोड उत्तर दिले आहे.

ह्या निमित्ताने मल्लिका दुआ म्हणाली, “कुठल्यातरी अज्ञात स्क्रीनच्या मागे बसून ऑनलाईन वाईट कॉमेंट्‌स करणे खूपच सोपे… फॅशनेबल आहे. अशा लोकांना दुसऱ्यांना व्यक्तिगत आणि अपमानास्पद शेरेबाजी करण्यात, इतरांच्या शरीराबाबत वाईटसाईट बोलण्यात विकृत आनंद मिळतो.” ती पुढे म्हणाली, “पहिल्यांदा मला राग आल नाही पण खूप वाईट वाटलं, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी काम करता, तुमचे सर्वोत्तम देता आणि तेही पूर्ण प्रेमाने, तेव्हा तुम्हांला आशा असते की सगळेजण त्याचे कौतुक करतील. पण मग तुमच्या लक्षात येतं की हे अज्ञात, निर्लज्ज मुर्ख ट्रोलर्स लोकांचे कामच त्यांच्यापेक्षा अधिक यशस्वी लोकांना त्रास देणे हे असते. ते ह्या अज्ञातपणाचा फायदा उठवतात आणि इंटरनेटवर त्यांच्या मनातील असुरक्षितता आणि निराशेला ह्या द्वेषासह पद्धतीने वाट मोकळी करून देतात. त्यामुळे खरंतर ते स्वतःलाचा ट्रोल करत आहेत,
मला नाही.” 

डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडियाच्या प्रीमिअम आणि डिजिटल नेटवर्क्सच्या उपाध्यक्षा श्रीमती झुल्फिआ वारिस म्हणाल्या, “बानी जे च्या सुरूवातीच्या ट्रोल्ड व्हिडीओला मिळत असलेला प्रतिसाद पाहून आम्ही अतिशय खुश आहोत. आम्हांला मिळत असलेल्या कॉमेंट्‌स, प्रतिक्रिया अतिशय उत्तम आहेत. जरूरी असा ऑनग्राऊंड प्रभाव निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नात मल्लिका दुआचा ट्रोल्ड व्हिडीओ त्यातील चर्चेला पुढे घेऊन जातो.” तुम्हांला मिळत असलेल्या ट्रोलिंगमुळे गांगरून जाऊ नका. इंटरनेटच्या मागे दडलेला आवाज तुमच्यातील सुपरवुमनचे काहीच बिघडवू शकत नाही. हातात गरम कॉफीच्या मस्त कपासह टीएलसीच्या राईजवरील ट्रोल्डवरून छान प्रेरणा मिळवा.
Web Title: Mallika Duaane told the trollers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.