Main Maike Chali Jaungi Tum Dekhte Rahiyo fame namish taneja and vani sharma has a special bond | मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियोच्या सेटवर नमिश तनेजाला भेटली ही बहीण
मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियोच्या सेटवर नमिश तनेजाला भेटली ही बहीण

भारतीय सणांमध्ये प्रेमाच्या नात्यांचा उत्सव असतो. तीज हा असाच एक सण आहे, जो देशभरात साजरा केला जातो. अलीकडेच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो मालिकेच्या सेटवर तीजचा उत्सव उत्साहात साजरा झाला आणि नमिश तनेजा म्हणजे समरला या मालिकेच्या सेटवर एक बहीण देखील भेटली. त्याने तिच्यासाठी एक भेटवस्तू देखील आणली होती.
 
नमिश तनेजा हा त्याच्या परिचितांमध्ये एक प्रेमळ मित्र म्हणून ओळखला जातो, ज्याला भेटवस्तू देणे खूप आवडते. या मालिकेत तो समरची व्यक्तिरेखा साकारत आहे. तो एक आदर्श मुलगा असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. समर आपल्या आसपासच्या सर्व लोकांना प्रसन्न ठेवण्यासाठी धडपड करत असतो, तसेच तो आपल्या बहिणींची खूप काळजी घेतो असे मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळते. सारिका म्हणजे वाणी शर्मा मालिकेत समरच्या बहिणीची भूमिका साकारत आहे आणि आता प्रत्यक्षात देखील त्यांच्यात बहिण-भावाचे नाते निर्माण झाले आहे. समर तिला अभिनयाबद्दल टिप्स देतो. तसेच शॉटमधील विश्रांतीच्या वेळेत ते दोघे एकमेकांसोबतच वेळ घालवतात. या मालिकेतील सर्व कलाकारांचे मिळून एक कुटुंबच झाले आहे. हे सगळे सेटवर एकत्र खूप मौज-मस्ती करतात. याविषयी नमिश तनेजा म्हणजे समरला विचारले असता तो सांगतो, “होय, मी वाणीला माझ्या बहिणीसारखेच मानतो. आम्ही सह-कलाकार आहोत आणि पडद्यावर बहिण-भावाची व्यक्तिरेखा साकारत आहोत... मी खऱ्या आयुष्यात तिची इतकी काळजी कधी घेऊ लागलो, ते मला समजलेच नाही. मी जेव्हा वाणीशी बोलतो तेव्हा माझ्या बहिणीशीच बोलत असल्यासारखे मला वाटते. ती दिल्लीत राहते आणि मी कामाच्या निमित्ताने मुंबईत राहतो. त्यामुळे मी तिला सारखा भेटू शकत नाही. वाणीच्या उत्साही स्वभावामुळे सर्वांना ती खूप आवडते. तीजच्या निमित्ताने मी तिला कुर्तींचा सेट भेट दिला आहे आणि आमच्या मालिकेसाठीदेखील अशाच प्रकारचे दृश्य चित्रित करण्यात आले आहे. वाणीसारख्या हुशार आणि गोड कलाकारांसोबत काम करायला मिळत असल्याचा मला आनंद होत आहे.”
 
‘मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो’ ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळत आहे.  


Web Title: Main Maike Chali Jaungi Tum Dekhte Rahiyo fame namish taneja and vani sharma has a special bond
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.