Madhuri will return to smaller screens through this program | ​या कार्यक्रमाद्वारे माधुरी दिक्षित करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन

धक धक गर्ल या नावाने ओळखली जाणारी माधुरी दिक्षित आता कलर्सच्या विशेष डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने मधून परीक्षक म्हणून टेलिव्हिजनवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मध्ये तिच्या सोबत हम्प्टी शर्मा की दुल्हनिया आणि बद्रिनाथ की दुल्हनियाचे प्रसिद्ध दिग्दर्शक शशांक खेतान आणि कंटेम्पररी डान्स शैलीसाठी आणि झलक दिखला जा मधील सहभागासाठी प्रसिद्ध असलेला कोरियोग्राफर तुषार कालिया परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहे.  
डान्स दिवानेद्वारे क्रेझी आणि पॅशनेट डान्सरना त्यांचे टॅलेंट दाखविण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला आहे. मुले, तरूण आणि प्रौढ अशा तीन वेगवेगळ्या वयोगटातून आलेले सर्व स्पर्धक त्यांच्या त्यांच्या गटानुसार स्पर्धेत उतरतील. प्रत्येक वयोगटातील एक असे तीन फायनलिस्ट अंतिम डान्स दिवाना बनण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतील. या शोविषयी बोलताना माधुरी दिक्षित सांगते, "कलर्स आणि माझ्यात एक खास नाते आहे आणि डान्स दिवाने सारख्या वैशिष्ट्यपूर्ण नवीन रिअॅलिटी शो मध्ये सहभागी होण्याचा मला आनंद झाला आहे. या शोची युएसपी आहे की, तो प्रत्येक वयोगटातील डान्सची पॅशन साजरी करणार आहे, भारतातील तीन पिढ्या एकाच मंचावर नृत्य सादर करणार आहेत. आमच्या शोचे वेगळेपण हे आहे की, आम्ही मुलांपासून ते प्रौढांपर्यत सगळ्या स्पर्धकांमधील डान्सची दिवानगी पाहण्यासाठी उत्सुक आहोत. माझ्यासाठी डान्स हे एक पॅशन आहे आणि मला इथपर्यंत पोहोचवण्यात त्याचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे मी अतिशय उत्सुकतेने हा शो सुरू होण्याची वाट पाहात आहे. या कार्यक्रमाद्वारे आम्हाला भारताचे अस्सल डान्स दिवाने शोधता येतील याची आम्हाला खात्री आहे."
या कार्यक्रमाविषयी दिग्दर्शक शशांक खेतान सांगतात, “डान्स दिवाने मधून, मी एका रिअॅलिटी शो मध्ये प्रथम पदार्पण करत आहे, जो सगळा फाफटपसारा काढून टाकून एकाच मंचावर वेगवेगळ्या वयोगटाचे लोक एकत्र आणणार आहे. डान्स मधील त्यांच्या दिवानगीने भारताला मंत्रमुग्ध करणाऱ्या टॅलेंटेड डान्सरच्या शोधात आम्ही आहोत आणि यासाठी वयाची अट नाही. परीक्षकांच्या पॅनेल मध्ये माधुरी दिक्षीत असणे हा एक गौरवच आहे, त्या माझ्या अतिशय आवडत्या आहेत आणि मी आता लवकरच सुरू होणाऱ्या शूटिंगची वाट पाहात आहे.”

Also Read : धकधक गर्लच्या पहिल्याच मराठी चित्रपटात बॉलिवूडच्या ‘या’ चॉकलेट बॉयची एंट्री, पाहा ट्रेलर!
Web Title: Madhuri will return to smaller screens through this program
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.