Madhuri Sanjeev has changed her name for this reason, otherwise she would have remained there today. Madhuri Dixit! | चक्क या कारणामुळे माधुरी संजीव यांनी नावातच केला बदल,नाहीतर आज त्याही राहिल्या असत्या माधुरी दिक्षित!वाचा सविस्तर

कलाकार त्यांच्या अभिनयाने रसिकांची मने जिंकतात. रसिकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवतात. रसिकांच्या मनात या कलाकारांची नावंही घर करुन असतात.या कलेच्या दुनियेत कलाकार नाव कमावण्यासाठी येतात. त्यांच्या नावानेच त्यांची वेगळी ओळख निर्माण होत असते.मात्र अनेकदा असेही होते की सेम टु सेम नाव असल्यामुळे कलाकारांना ओळखण्यात गल्लत होण्याचीही शक्यता असते.कलाकारांच्या भूमिकेच्या नावाप्रमाणेच त्यांचे खरं नाव रसिकांच्या लक्षात असते. त्यामुळेच असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी चक्क नावातच बदल करत आपली नवी ओळख निर्माण केली आहे.अनेक कलाकारांचे खरे नावही फार कमी जणांना माहिती आहेत.नुकतेच टीव्ही अभिनेत्री माधुरी संजीव यांनीही आजपर्यंत कोणालाही माहिती नसलेली त्यांच्या एका खास गोष्टीचा खुलासा केला आहे.एका मुलाखतीत माधुरीने सांगितले की आपले खरे नाव 'माधुरी दीक्षित' असेच आहे.या आश्चर्यकारक माहितीबद्दल ती म्हणाली, “लोकांना मी माझं नाव माधुरी दीक्षित आहे, असं सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांपुढे हिंदी चित्रपटांतील धकधक गर्ल माधुरी दीक्षितच येत असे. त्यामुळे हे माझं खरं नाव आहे, यावर त्यांचा विश्वास बसत नसे. ब-याचदा लोकांना मी चेष्टा करत असल्याचे वाटायचे. आणि ते माझं म्हणणं गांभीर्याने घेत नसत. एक अभिनेत्री म्हणून मी माधुरी दीक्षितचा खूप आदर करते आणि माझ्या नावामुळे लोकांचा गैरसमज होऊ नये, अशीच माझी इच्छा होती. तेव्हा मी माझं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि आता मी माझ्या  नावापुढे माधुरी संजीव असे लावते. संजीव हे माझं मधलं नाव आहे.” सुमारे दशकभरापूर्वी माधुरी संजीवने आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला आणि 'हँसी तो फँसी', 'आप मुझे अच्छे लगने लगे' यासारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्ये तिने भूमिका रंगविल्या. ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत तिची राधेच्या आईची व्यक्तिरेखा ही पारंपरिक भारतीय मातेची असून राधेच्या वडिलांनंतर घरात तिचा अधिकार चालत असे.तसेच मराठी मालिका 'काहे दिया परदेस' मालिकेत माधुरी संजीव यांनी शीवच्या आईची भूमिका साकारली होती.त्यांच्या या भूमिकेला इतर भूमिकांप्रमाणेच तुफान पसंती मिळाली होती.पडद्यावरील काहे दिया परदेस ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती.बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. 


‘कृष्णा चली लंडन’ मालिकेची नावीन्यपूर्ण कथा आणि राधा-कृष्णाच्या अनोख्या प्रेमकथेमुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेची चर्चा सुरू आहे. चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अनेक दशके भूमिका रंगविलेले काही कलाकार या मालिकेत भूमिका साकारीत आहेत.अशाच एका कलाकारचे नाव आहे माधुरी संजीव.मालिकेचा नायक राधे (गौरव सरीन) याची आई शुक्लेन हिची भूमिका माधुरी संजीव साकारत आहे.
Web Title: Madhuri Sanjeev has changed her name for this reason, otherwise she would have remained there today. Madhuri Dixit!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.