Madhuri dixit tell secret about success | माधुरी दीक्षितने दिला 'हा' यशाचा कानमंत्र
माधुरी दीक्षितने दिला 'हा' यशाचा कानमंत्र

ठळक मुद्देलवकरच माधुरी करण जोहरच्या मल्टीस्टारर कलंक सिनेमात दिसणार आहे या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल २१ वर्षानंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकत्र दिसणार आहे

नुकतीच माधुरी दीक्षित डान्स+ 4 मध्ये सेलेब्रिटी गेस्ट म्हणून आली होती. शक्ती मोहनचा परफॉर्मन्स तिला खूपच आवडला. माधुरीने उभे राहून शक्तिमोहनच्या बहारदार नृत्याला दाद दिली. माधुरी दीक्षितकडून इतके कौतुक झाल्यवर स्वाभाविकच शक्तिमोहनला स्वर्ग दोन बोटांवर उरला होता. माधुरीच्या गीते चोली के पीछे, मार डाला, घागरा, डोला रे डोला गाजलेल्या गाण्यांवरील परफॉर्मन्सेस पाहून थक्क झाली. ही गाणी स्पर्धकांनी पॉपिंग स्टाईल आणि अॅनिमेशन प्रकारात केली. तिच्या गाण्यांवर असेही काही करता येऊ शकेल असा विचारही कोणाच्या मनात आला नसेल. 

माधुरी म्हणाली, “मला गुणी लोकांसोबत काम करायला मिळाले, चांगली गाणी आणि उत्तम कोरियोग्राफर्स मिळाले म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. कठोर मेहनतीला काही पर्याय नाही, यशस्वी होण्यासाठी २ टक्के बुद्धीचातुर्य आणि ९८ टक्के कठोर मेहनतीची गरज असते. माझ्या आयुष्यातील प्रत्येकच भूमिकेला मी माझे सर्वोत्तम दिले आहे, अगदी अभिनेत्री असण्यापासून डान्सर, आई, पत्नी अगदी प्रत्येक भूमिकेला. दररोज सराव करणे हे डान्समध्ये अतिशय महत्त्वाचे आहे.”


लवकरच ती करण जोहरच्या मल्टीस्टारर कलंक सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल २१ वर्षानंतर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि संजय दत्तसह आलिया व वरूण यांच्याव्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर व कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९ एप्रिल, २०१९ला प्रदर्शित होणार आहे. २१ वर्षानंतर माधुरी दीक्षित व संजय दत्तला रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे
 


Web Title: Madhuri dixit tell secret about success
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.