Madhuri Dixit, Shashank Khaitan and Tushar Kalia will be searching for the dance lamp | डान्स दिवानेचा शोध घेणार माधुरी दीक्षित, शशांक खेतान आणि तुषार कालिया

उत्कृष्ट डान्सर त्यांच्या कौशल्याने उत्कृष्ट बनत नाहीत तर ते त्यांच्या पॅशनमुळे प्रसिद्ध होतात. संपूर्ण देशात एकमेव डान्स दिवानेच्या शोधासाठी कलर्स भारतातील तीन पिढ्यांना मोठ्या मंचावर त्यांची कला सादर करण्याची संधी देत आहे आणि याचे परीक्षक माधुरी दीक्षित, शशांक खेतान आणि तुषार कालिया आहेत. डान्ससाठी असणाऱ्या पॅशनवर भर देणाऱ्या या मंचावर सर्व प्रकारच्या लोकांना आमंत्रित केले जात आहे आणि त्यांचे लहान मुले, तरूण आणि प्रौढ असे तीन गट पाडण्यात आले आहेत. प्रत्येक श्रेणीतील एक असे तीन फायनलिस्ट डान्स दिवाना बनण्यासाठी स्पर्धा करणार आहेत. ड्रीम्स व्हॉल्ट मीडियानिर्मित हा शो २ जून पासून प्रत्येक शनिवार आणि रविवारी रात्री नऊ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाद्वारे परीक्षक म्हणून पुन्हा परत येण्याविषयी माधुरी दीक्षित सांगते, "कलर्स वाहिनी आणि माझ्या मध्ये नेहमीच एक खूप चांगले नाते राहिले आहे आणि आता त्यांच्या डान्स दिवाने या नव्या वैशिष्ट्यपूर्ण रिअॅलिटी शो मध्ये सहभागी होताना मी अतिशय आनंदी आहे. या शोचा युएसपी तीन पिढ्यांसाठी एकच मंच असणे हा आहे. आमच्या स्पर्धकांची दिवानगी कार्यक्रमात पाहायला मिळेल अशी आम्हाला आशा आहे.  या कार्यक्रमात लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत स्पर्धक सहभागी होणार आहेत हेच आमच्या शोचे वेगळेपण आहे. माझ्यासाठी डान्सिंग हे पॅशन आहे आणि त्यामुळेच मी हा कार्यक्रम सुरू होण्याची उत्सुकतेने वाट पाहात आहे."
दिग्दर्शक शशांक खेतान सांगतो, “डान्स दिवाने मधून मी एका रिअॅलिटी शो मध्ये पदार्पण करत आहे. डान्सच्या दिवानगी मधून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गुणवान डान्सरच्या शोधात आम्ही आहोत आणि यात वयाचे बंधन नाहीये. माधुरी दीक्षित या कार्यक्रमाच्या परीक्षक असणे आमचा गौरवच आहे. त्या माझ्या आवडत्या अभिनेत्री असल्याने या कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू व्हायची मी वाट पाहात आहे.” नामवंत परीक्षकांच्या पॅनेलमध्ये सामील व्हायला मिळत असल्याने कोरिओग्राफर तुषार कालिया खूपच खूश आहे. तो सांगतो, “एक स्पर्धक म्हणून सुरूवात करून आता परीक्षकांच्या तिकडी मध्ये परीक्षक म्हणून सामील होण्याचा प्रवास प्रदीर्घ होता आणि समृद्ध करणाराही होता. ही मला मोठी संधी मिळाली असून माधुरी मॅम आणि शशांक खेतान यांच्या सोबत परीक्षक म्हणून काम करणे हे खरोखर भारावून टाकणारे आहे. मला खात्री आहे की हा अनुभव अतिशय अविस्मरणीय असणार आहे."

Also Read : ​प्रेक्षकांची बकेट लिस्ट रिकामीच
Web Title: Madhuri Dixit, Shashank Khaitan and Tushar Kalia will be searching for the dance lamp
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.