Look at this like Ranbir Kapoor, look at this photo | रणबीर कपूरचाचाही Look A Like आला समोर,पाहा हा फोटो
रणबीर कपूरचाचाही Look A Like आला समोर,पाहा हा फोटो
इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायचे असेल तर भूमिकांप्रमाणेच लूकमध्येही बदल करणे कलाकारांना गरजेचे असते. एकाच कोणत्याही इमेजमध्ये न अडकता वेगवेगळे प्रयोग सध्या कलाकार आपल्या लूकमध्येही करताना दिसतात.नव्या संधी मिळवण्यासाठी मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा कलाकार करत असतात.सध्याची नव्या कलाकारांची पीढी या गोष्टीला छेद देणारी आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे 'बालिका वधू' फेम शशांक व्यास.सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.त्याचा रॉकिंग अंदाज, स्टाइल, हटके हेअर स्टाइल शशांक सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.जगात सेम टू सेम दिसणा-या सात व्यक्ती असतात असं म्हटलं जातं. सेलिब्रिटींचे तर अनेक डुप्लिकेट आपण पाहिले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख, अनिल कपूर, देवानंद अशा एक ना अनेक गाजलेल्या कलाकारांचे सेम टू सेम भासावे असे डुप्लिकेट आहेत. यात आता रणबीर कपूरच्याही लुक अ लाईकची भर पडली आहे.सोशल मीडियावर शशांकचे फोटो याच कारणामुळे जास्त चर्चेत आहेत. त्याचे फोटोज पाहून चाहते त्याला रणबीर कपूर प्रमाणेच तो दिसत असल्याचे कमेंट करताना दिसत आहेत.टीव्हीचा रणबीर कपूर अशी त्याची इमेज आता बनत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या वेडींग सिझन सुरू आहे. त्यामुळे शशांकच्याही लग्नाच्या चर्चा ऐकायला मिळत आहे.यावर त्याने एका मुलाखतीत सांगितले की,"माझे वडील विकास व्यास मुली शोधत आहेत. ते नातेवाईकांना भेटतात आणि मला कशी मुलगी आवडते हे विचारतात. माझ्यासाठी वय महत्त्वाचे नाही. मी एक अॅक्टर आहे आणि करिअरव फोकस करतोय."शंशाक व्यासला 'बालिका वधू' या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्याने साकारलेली जग्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या भूमिकेमुळे प्रेक्षकांनी शशांकला अक्षरशः डोक्यावर घेतले. या मालिकेनंतर त्याने 'जाना ना दिल से दूर' या मालिकेतही काम केले.तुर्तास शशांकचा हा नवीन लूक रणबीर कपूरप्रमाणे वाटत असला तरी तो लवकरच नवीन भूमिकेत झळकणार असून तो अशा अंदाजात रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे बोलले जात आहे.
Web Title: Look at this like Ranbir Kapoor, look at this photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.