ही चिमुरडी आहे छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री... ओळखा पाहू कोण आहे ही?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 07:15 AM2019-06-09T07:15:00+5:302019-06-09T09:53:19+5:30

या अभिनेत्रीने काहीच कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

This is a little girl, the famous actress on the small screen. Who is there to recognize that? | ही चिमुरडी आहे छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री... ओळखा पाहू कोण आहे ही?

ही चिमुरडी आहे छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री... ओळखा पाहू कोण आहे ही?

googlenewsNext
ठळक मुद्देगायत्रीने तिच्या इन्स्टाग्रामला काही महिन्यांपूर्वी तिचा बालपणीचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोतली चिमुकली गायत्री खूपच गोड दिसत असून ती आताप्रमाणेच लहानपणी देखील खूपच छान दिसायची असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. या मालिकेतील गायत्री दातार, शिल्पा तुळसकर आणि सुबोध भावे यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत विक्रांतच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच राजनंदिनीची एंट्री झाल्यापासून आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. ही मालिका जुलै महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवट काय होणार याविषयी प्रेक्षकांकडून तर्क वितर्क लावले जात आहेत.

तुला पाहते रे ही गायत्री दातारची पहिली मालिका असली तरी तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. पुण्याच्या गायत्रीने या मालिकेतून प्रमुख भूमिका सादर करत टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पदार्पणातच तिला सुबोध भावे सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं तिने सोनं केलं.

आज गायत्रीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग मिळालेले असून तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करत आहेत. गायत्री तिच्या खऱ्या आयुष्यातील, तिच्या फॅमिलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

गायत्रीने तिच्या इन्स्टाग्रामला काही महिन्यांपूर्वी तिचा बालपणीचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोतली चिमुकली गायत्री खूपच गोड दिसत असून ती आताप्रमाणेच लहानपणी देखील खूपच छान दिसायची असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

 

गायत्री दातार मालिकेत साकारत असलेली इशा निमकर ही अत्यंत साधी आणि सोज्वळ मुलगी आहे. तिला जगातील छक्के पंजे कळत नाहीत. पण खऱ्या आयुष्यात गायत्री खूपच वेगळी आहे. ती खूप अ‍ॅडव्हेंचर्स असून तिला ट्रेकिंगची तसेच फिरायची खूप आवड आहे. गायत्रीने मनालीला ट्रेकिंगचा आणि कोयना नदीत रिव्हर राफ्टिंगचा धमाल अनुभव घेतलेला आहे.

तुला पाहते रे या मालिकेतील इशा, विक्रम या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या आहेत. या मालिकतील सुबोधचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडत आहे. पण त्याचसोबत गायत्री दातारची ही पहिला मालिका असली तरी तिने तिच्या अभिनयातातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे खुद्द सुबोध भावेनेच सांगितले आहे.

Web Title: This is a little girl, the famous actress on the small screen. Who is there to recognize that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.