'Little Bahu' Ruby Glamor Style! | 'छोटी बहू'फेम रूबीनाचा ग्लॅमसर अंदाज !

आशियातील सर्वात सेक्सी महिलांच्या यादीच टीव्ही अभिनेत्री निया शर्माची आणि दृष्टी धामी या दोघींची वर्णी लागल्यानंतर आता सगळ्याच टीव्ही अभिनेत्रींना निया  आणि दृष्टी प्रमाणे आपल्या नावावरही सेक्सी महिलेचा मान मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत. छोट्या पडद्यार अगदी साडी वजनदार दागिने आणि संस्कारी बहू म्हणत सध्या काही अभिनेत्री मालिका गाजवतायेत.त्यांच्या याच अंदाजामुळे त्या रसिकांच्या घराघरांत लाडकी बहू म्हणून हिटही ठरतायेत. मात्र आता अचानक या टीव्ही अभिनेत्री त्यांच्या फोटोशूटमुळे बोल्ड झाल्याचे पाहायला मिळतेय. सध्या काही टीव्ही अभिनेत्री आपले बोल्ड फोटोशूट करत सोशल मिडियावर व्हायरल करताना दिसतायेत.याच यादीत आता 'छोटी बहू' फेम रूबीना दिलैकही मागे नाहीय. नुकतेच तिनेही ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. यापूर्वी कधीही रूबीनाला या लुकमध्ये पाहिले गेले नाहीय. ग्लॅमरस दिसण्यासाठी रूबीनाने आता साडीला टाटा बाय करत वेस्टर्न आऊटफिट परिधान करत हे फोटोशूट केले आहे. 

रुबीनाने अलीकडेच इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये तिचा सुपर हॉट अंदाज लक्ष वेधून घेतोय. रुबीना आता 'शक्ति - अस्तित्व के एहसास' या मालिकेत सौम्याच्या भूमिकेत झळकतेय. यापूर्वी रुबीना 'सास बिना ससुराल','पुनर्विवाह','देवो के देव महादेव','जिनी और जूजू' या मालिकांमध्ये झळकली होती. इतकेच नाही रुबीना प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अभिनव शुक्लासोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे यााही कारणामुळे ती सध्या चर्चेत आहे. रूबीनाचा हटके ग्लॅमरस लुक रसिकांनाही आवडतोय. त्यामुळे सोशल मिडियावर रूबीनाचे चाहते तिला सपोर्ट करत भरभरून कौतुकही करतायेत. Web Title: 'Little Bahu' Ruby Glamor Style!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.