'Life should be thrilled' - Neha Dhupia | ‘आयुष्य थ्रिल असावे’ -नेहा धुपिया

गितांजली आंब्रे 

एमटीव्ही वाहिनीवरील एक प्रसिद्ध शो ‘रोडीज: एक्स्ट्रीम’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. युवावर्गाची पसंती मिळवणारा हा शो म्हणून आपण याकडे पाहतो. स्पर्धकांसमोर असलेली वेगवेगळी आव्हाने, टास्क यांनी भरपूर असलेला हा शो आयुष्य किती आव्हानांनी भरलेले आहे, हे शिकवतो. या शोचे दोन टीमलीडर नेहा धुपिया आणि निखील चिनप्पा यांनी अलिकडेच लोकमत आॅफिसला भेट दिली. भेटीदरम्यान रोडीजच्या प्रवासाविषयी अनेक गप्पा-टप्पांचा तास रंगला. 

*  प्रेक्षकांना ‘रोडिज एक्स्ट्रीम’ या सीझनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार आहे?
- याविषयी बोलताना नेहा सांगते,‘सर्वांना आवडणारा हा शो तोच आहे. कन्सेप्ट देखील तीच आहे. फक्त शोमधील आव्हानांची तीव्रता बदलली आहे. रणविजयचा अंदाज वेगळाच दिसतो आहे. आव्हानांमधील थ्रिल नेहमीप्रमाणेच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार हे नक्की.’

* नेहा, मागील सीझनला तुझ्या टीममधील मुलगी जिंकली होती. यावेळी तू किती तयारीनिशी आली आहेस?
- (या प्रश्नाचे उत्तर देताना निखिल आणि नेहामध्ये पुन्हा शाब्दिक मजा-मस्ती सुरू झाली. निखीलने गमतीने म्हटले की, नेहाचा आॅडिशनला म्हटलेला आवडीचा डायलॉग आहे. ती म्हणते ‘जितने की मुझे आदत पड गयी हैं’) नेहा म्हणते,‘रोडीजसाठी काम करताना दोन गोष्टी असतात. एक म्हणजे रोडीजची जर्नी एन्जॉय करा. ती जर्नी जिंका नाहीतर दुसरे म्हणजे यानंतर स्वत:ला निखीलसारखे ‘कूल अ‍ॅण्ड काम’ बनवा. निखीलमधील प्रामाणिकपणा, कामातील सातत्य मला त्याच्याकडून शिकायला हवे. 

* नेहा, आॅडिशनच्या वेळेस जेव्हा एखादी मुलगी स्पर्धक म्हणून समोर येते तेव्हा तू तिला कशाप्रकारे पाठिंबा देतेस?
- खरंतर मुली या मुलांपेक्षा कुठेच कमी नसतात. अशी कोणतीच गोष्ट नाही की, जी मुले करतात आणि मुली करत नाहीत. आम्ही रोडीजच्या स्टेजवर एकमेकांना मुलगा-मुलगी असे नव्हे तर रोडीज म्हणूनच ट्रीट करतो. आम्हाला असा भेदभाव केलेला मुळीच आवडत नाही. मी ३ वर्षांपासून रोडीजसोबत काम करते आहे. पण, या तिघांनीही मला कधीही मुलगी म्हणून वेगळी ट्रिटमेंट दिली नाही. आम्ही आमच्या टीम घेऊन एकमेकांना टक्कर देतो, एकमेकांशी भांडतो. त्यातच खरी मजा आहे. 

* निखील, स्क्रिनवर तू खुपच कूल दिसतो आहेस. स्वत:ला एवढं कूल कसं ठेवू शकतोस?
- मला माहित नाही पण, मी माझी राहणीमानाची स्टाईल बिल्कुल बदलली नाही. तरी पण, मी अनेकांना कूल दिसतो. याचं कारणच आहे की, मी मला हवं तसं राहतो. प्रत्येकाने आपल्याला स्वत:ला जसं आवडतं तसंच राहावं कारण, कुणासारखं बघून तुम्हाला त्यांच्यासारखं होता येत नाही. त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी आहे तशी एन्जॉय करायला शिका. 

* ‘रोडीज’ची टीम यावेळेस कुठे कुठे फिरणार आहे?
- नेहा म्हणाली,‘या सीझनमध्ये आम्ही अरूणाचल प्रदेशमध्ये जाणार आहोत. मी खूपच उत्सुक आहोत की आम्ही तिथे कसे राहणार आहोत? मी स्वत: नॉर्थ इंडियात कधीच राहिलेले नाही.’ निखील म्हणाला,‘काझीरंगामध्ये आम्ही जाणार आहोत. मला खूप उत्सुकता आहे की, आम्ही तिथे केव्हा जाणार? आणि कशाप्रकारचे टास्क असणार याबद्दल मी उत्सुक आहे.’ 

* तुम्हाला रोडीजच्या निमित्ताने देशाच्या अनेक छोटया-मोठया प्रदेशांत जाण्याची संधी मिळते. कसा असतो वेगवेगळया ठिकाणी फिरण्याचा अनुभव? येथील लोकांचे अनुभव कसे येतात?
- निखील म्हणाला,‘भारत हा असा देश आहे की, जिथे आदरातिथ्य हे सगळयांत महत्त्वाचे असते. अनेकवेळा असे होते की, आम्हाला झोपायला कुठेही जागा नसायची तेव्हा आम्ही कुणाच्याही घरी जाऊन त्यांना घराच्या आंगणात झोपू देण्याची विचारणा केली की ते लगेचच परवानगी द्यायचे. सकाळी चहा, नाश्ता करूनच आमची रवानगी करायचे. खरंच पण, रोडीजमुळे संपूर्ण देशातील लोकांच्या मानसिकतेचा आम्हाला परिचय होतो.’ 

* नेहा, तू बॉलिवूडसारख्या प्लॅटफॉर्मवरून रोडीजकडे आलीस. तू रोडीजमध्ये असणं किती एन्जॉय करतेस?
- खरं सांगायचं तर, माझं पहिलं प्रेम चित्रपट हेच आहे. पण, होय मला रोडीजमध्ये आल्यापासून जगण्याचा एक वेगळा अँगल मिळाला आहे. आयुष्यात मलाही आव्हानं जाम आवडतात. त्यामुळे मी रोडीजमध्ये असणं एन्जॉय करते.
Web Title: 'Life should be thrilled' - Neha Dhupia
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.