Lettering is done through the private story 'Let It Come!' | पत्रलेखन हि खाजगी गोष्ट 'चला हवा येऊ द्या' च्या माध्यमातून सर्वांची झाली

२५ डिसेंबर २०१७ वाचकदीनी अरविंद जगताप लिखित 'पत्रास कारण की...' पुस्तकाचा प्रकाशन समारंभास डॉ. निलेश साबळे, सयाजी शिंदे, संजय जाधव, हेमलता अंतरकर, रमेश भाटकर, गणपतराव जगताप, सुदेश हिंगलासपूरकर, किरण येले इ. मान्यवर मंडळी उपस्थित होती.अरविंद जगताप यांची पत्रलेखन हि खाजगी गोष्ट 'चला हवा येऊ द्या' च्या माध्यमातून सर्वांची झाली आणि आता 'ग्रंथाली' मुळे पुस्तकरूपाने अली याबद्दल आनंद व्यक्त केला.यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी काहींनी अरविंद जगताप यांच्याबद्दलच्या काही आठवणी ताज्या केल्या. ‘हिंदीमध्ये शेतकऱ्यांबद्दलचं पत्र काव्यात्मक भाषेत अरविंद जगताप यांनी लिहिले होते. अनुपम खेर याना ते प्रचंड आवडले होते. ते पत्र वाचून माझ्याही डोळ्यांत अश्रू आले होते,' असे ही त्यांनी सांगितले, अशी आठवण निलेश साबळे यांनी सांगितली. 'पत्र ही आधीच्या काळी खूप जिवाभावाची गोष्ट असायची आणि अरविंदने आता पात्रांची जबाबदारी घेतली आहे.आजपर्यंतच्या निरनिराळ्या सिनेमांमधील त्याचे लिखाण खूपच अप्रतिम आहे, याचा मला अनुभवही आहे,' अशी भावना सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली. 'एक लेखक, कवी म्हणून त्यांची लोकांमध्ये ओळख आहेच. पण एक माणूस म्हणून कसं असावं हे मी त्यांच्याकडून शिकत आलो आहे,' अशी आठवण दिग्दर्शक संजय जाधव यांनी सांगितली.

Also Read:या तारेखपासून चला हवा येऊ द्या येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.या कार्यक्रमात आज मराठीसोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. हा कार्यक्रम सध्या काही दिवसांच्या ब्रेकवर गेलेला असल्याने या कार्यक्रमाचे फॅन्स या कार्यक्रमाला मिस करत आहे. पण या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या ८ जानेवारीपासून चला हवा येऊ द्याचा विश्वदौरा सुरू होणार आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर येणाऱ्या या विश्वदौऱ्यात चला हवा येऊ द्याची टीम आपल्यासोबत प्रेक्षकांना जगाची सफर घडवणार आहे.'चला हवा येऊ द्या'ने आतापर्यंत लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. पोस्टमन काका, शांताबाई, जज, वकील, मामा-भाचे, सासू- सून, पुणेरी बाई अशी वेगवेगळी पात्रं आपल्या जगण्याचा भाग बनली. मराठी सिनेमा आणि नाटकांसाठी या कार्यक्रमाने हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. पत्रांच्या माध्यमातून हसवता हसवता लोकांच्या डोळ्यात पाणी देखील आणले आणि आता जगाच्या नकाशावर मोहोर उमटवायला ही सतरंगी मंडळी सज्ज झाली आहेत. ८ जानेवारीपासून सुरू होत आहे.

Web Title: Lettering is done through the private story 'Let It Come!'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.