The letter Kothari will appear in small ownership or series | ​अक्षर कोठारी दिसणार छोटी मालकीण या मालिकेत

अक्षर कोठारीने चाहूल या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. आता या मालिकेनंतर अक्षय प्रेक्षकांना आणखी एका मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. छोटी मालकीण ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू होणार असून या मालिकेत अक्षर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षरने या मालिकेसाठी खूप मेहनत घेतली असल्याचे य मालिकेच्या त्याच्या लूकवरूनच दिसून येत आहे. या मालिकेत पिळदार मिशीमध्ये अक्षर दिसत असून त्याचा हा रांगडा लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
अक्षरच्या छोटी मालकीण या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. सोशल मीडियावर तर या प्रोमोची चांगली चर्चा आहे. या प्रोमोमध्ये त्याच्यासोबत त्याची नायिका दिसून येत आहे. या प्रोमोत तो त्याच्या नायिकेचे संरक्षण करत असल्याचे दिसत आहे. हीच नायिका त्याची छोटी मालकीण आहे. 
अक्षर कोठारीने कमला या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर तो चाहूलमध्ये दिसला. तसेच तो प्रियांका चोप्राची निर्मिती असलेल्या काय रे रास्कला या चित्रपटात देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या क्वीनमेकर या नाटकाची देखील चांगलीच चर्चा झाली होती. या नाटकाचे दिग्दर्शन राजन ताम्हाणे यांनी केल होते तर नागेश भोसले यांच्या पत्नी जॉय भोसले यांनी नाटकाची निर्मिती केली होती. या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळे यांचे होते तर अक्षर साकारत असलेल्या पात्राभोवतीच या नाटकाची कथा फिरत होती. अक्षरसोबत शितल क्षीरसागर या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली होती.
अक्षर कोठारीने आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे छोटी मालकीण या मालिकेतील भूमिका देखील तो तितक्याच ताकदीने साकारेल अशी त्याच्या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : चाहूलमधील सर्जा आणि शांभवीने घेतला पाऊसाचा आनंद
Web Title: The letter Kothari will appear in small ownership or series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.