Let's come to Singapore to get rid of the laughter | ​चला हवा येऊ द्याचा सिंगापूरमध्ये येणार हास्याचा पूर

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या कार्यक्रमात आज मराठीसोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. हा कार्यक्रम सध्या काही दिवसांच्या ब्रेकवर गेलेला होता. आता हा कार्यक्रम एका नव्या ढंगात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाचा सध्या विदेश दौरा सुरू आहे. या कार्यक्रमाची टीम आता सिंगापूर दौऱ्यावर गेली आहे.
उगवत्या सूर्याच्या देशात अर्थात जपानमध्ये मनोरंजनाचा 'सूर्योदय' करून 'जगभर चला हवा येऊ द्या'ची टीम आता नयनरम्य सिंगापूरमध्ये पोहचली आहे.  मागच्या आठवड्यात जपानमध्ये थुकरटवाडीच्या कलंदरांनी हास्याचा धुमाकूळ घातला. आता ही टीम सज्ज झाली आहे सिंगापूरमध्ये हास्यकल्लोळ घालण्यासाठी! दुबई, लंडन, पॅरिस, जपानच्या यशस्वी दौऱ्यांनंतर 'वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या'चं वादळ घोंघावणार आहे. स्वछतेसाठी आणि शिस्तप्रियतेसाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या सिंगापूर नगरीत आता ही टीम मजा मस्ती करणार आहे. सिंगापूरची ही धमाल येत्या सोमवार आणि मंगळवारच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
सिंगापूरचा युनिव्हर्सल स्टुडिओ, मत्सालय, सेंटोसा आयलंड, बटरफ्लाय पार्क, जुरोंग बर्ड पार्क अशा वेगवेगळ्या प्रेक्षणीय ठिकाणांची सफर घर बसल्या तुम्हाला होणार आहे. याशिवाय पाहायला मिळणार आहे सिंगापूरचा 'पांडू हवालदार.' डॉ. निलेश साबळे दादा कोंडकेंच्या भूमिकेत आणि कुशल बद्रिके अशोक सराफांच्या भूमिकेत सिंगापूरमध्ये हा आगळावेगळा 'पांडू हवालदार' सादर करणार आहेत. सोबतीला सागर कारंडेने साकारलेला शाकाल बघायला मिळणार आहे. 'जागो मोहन प्यारे' या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील अतुल परचुरे आणि श्रुती मराठे हे कलाकार मंडळी थुकरटवाडीतील अतरंगी विनोदवीरांसोबत सिंगापूरमध्ये कल्ला करताना दिसतील.
जिथे मराठी तिथे झी मराठी म्हणत थुकरटवाडीतला गुलाब आणि त्याचं कुटुंब जगभरातील रसिक प्रेक्षकांना हसवत आहे. आता सिंगापूरमध्ये हास्याचा पूर आणण्यासाठी ही मंडळी सज्ज झाली आहेत. हा सिंगापूर दौरा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : फॅमिली वेडींगमध्ये कुशल बद्रिकेची धम्माल मस्ती!
Web Title: Let's come to Singapore to get rid of the laughter
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.