अबोली कुलकर्णी 

‘बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी
बांधिते भाऊराया, मी तुझ्या हाती...
बंधन असुनही, बंधन थोडेच
या तर हळव्या रेशीमगाठी...’


श्रावण सुरू झाला की, प्रत्येक बहिण ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असते असा तो रक्षाबंधनाचा सण आता जवळ आला. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. प्रत्येक बहिण मोठया उत्सुकतेने यंदा भाऊरायासाठी काय वेगळे करायचे? याचा विचार करत असते. आपल्यासारखेच सेलिब्रिटींनाही ही उत्सुकता लागलेली असते. पाहूयात, टीव्ही जगतातील सेलिब्रिटी कशाप्रकारे रक्षाबंधनाचा सण साजरा करणार आहेत ते..* राजेश्वरी सचदेव
सोनी वाहिनीवरील ‘पेशवा बाजीराव’ या हिंदी मालिकेत राधाबाईची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी सचदेव ही रक्षाबंधनाच्या सणाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. ती म्हणते,‘प्रत्येकवर्षाप्रमाणे मी भाऊ जगमोहनसाठी सकाळी उठून राखी बांधेल. त्यानंतर त्याला मिठाई भरवून त्याच्याकडून छान गिफट घेईल. मला आठवते, मी लहान असताना माझ्या हाताने त्याच्यासाठी राखी बनवत असे आणि तीच राखी त्याला बांधतही असे. ‘पेशवा बाजीराव’ मध्ये तुम्ही बाजीराव आणि त्याच्या बहिणीचे प्रेम पाहू शकता. तसेच माझ्या वैयक्तिक आयुष्यात मुलांना हा सण तेवढ्याच आनंदाने साजरा करताना पाहून खूप आनंद होत आहे.* करण सूचक
अभिनेता करण सूचक यालाही रक्षाबंधन या सणाची खूप उत्सुकता लागून राहिली आहे. तो म्हणतो, ‘ खरंतर मला सखी बहिण नाहीये. पण, ‘पेशवा बाजीराव’ मालिकेत बाजी आणि त्याच्या बहिणीचे प्रेम पाहून भाऊ-बहिणीचे प्रेम असेच असले पाहिजे असे वाटते. ते दोघे एकमेकांच्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहतात. माझी चूलत बहिण सोनल राडिआ हिच्यासोबत माझे सख्ख्या बहिणीपेक्षाही जवळचे नाते आहे. ती मला दरवर्षी राखी पाठवते. यावर्षीही तिने राखी पाठवलेली राखीच मी बांधणार आहे.’ 


 
* आकांक्षा पूरी

सोनी वाहिनीवर लवकरच सुरू होणाऱ्या  ‘विघ्नहर्ता गणेश’ या टीव्ही शोवर पार्वतीची भूमिका करणाऱ्या  अभिनेत्री आकांक्षा पूरी हिचे म्हणणे आहे की,‘ राखी या सणाबद्दल मी खूप भावुक आहे. मी आणि माझा भाऊ खूप प्रेमाने या सणाला मानत असतो. त्याला बेसनाचा लाडू खूप आवडतो. त्यामुळे मी बेसनाच्या लाडूचीच मिठाई आणत असते. यावर्षी मी विघ्नहर्ता गणेश या शूटिंगमध्ये व्यस्त असून त्याला भेटायला कदाचित जाऊ शकणार नाही. पण, मला पूर्ण विश्वास आहे की, माझा भाऊ ‘विघ्नहर्ता गणेश’ च्या सेटवर मला सरप्राईज देण्यासाठी नक्की येईल. सेटवरच माझ्याकडून राखी बांधून घेईल आणि तो माझ्या पार्वती या रूपाला नक्कीच पाहिल.


 
* आदिती देशपांडे

‘पहरेदार पिया की’ या मालिकेत काकीसाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आदिती देशपांडे म्हणते की,‘ यावर्षीची राखी माझ्यासाठी खूप खास आहे. कारण माझा छोटा भाऊ  गेल्या १५ वर्षांपासून भारताबाहेर (यूएस) मध्ये राहत आहे. यावर्षी तो त्याच्या कुटुंबासोबत आला होता. शोच्या सेटवर आल्यावर त्याने मला मी राजस्थानी कॉस्च्युममध्ये असल्याने ओळखलेच नाही. पण, मी दरवर्षी एखाद्या एनजीओकडूनच राखी खरेदी करते. माझे सगळ्यांना आवाहन आहे की, सर्वांनी एनजीओकडूनच राखी खरेदी करावी. शारिरीकदृष्ट्या कमकुवत असून देखील मोठया प्रेमाने ते राखी बनवत असतात. मी माझी परंपरा कायम ठेवणार आहे. * रिद्धीमा पंडित
‘द ड्रामा कंपनी’ या शोवर जिच्या जोक्सवर हसून हसून आपण लोटपोट होतो अशी अभिनेत्री रिद्धीमा पंडित. ही काहीशा वेगळयाप्रकारे रक्षाबंधनाचा सण साजरा करत असते. ती म्हणते,‘ राखी हा सण साजरा करण्याचा माझा अंदाजच काही वेगळा आहे. कारण मला सख्खा भाऊ नाही म्हणून मी माझ्या भाच्च्याला राखी बांधते. माझी बहिण रीमाचा मुलगा शौर्यला सखी बहिण नाही आणि मला भाऊ नाही. त्यामुळे आम्ही एकत्र राखीचा सण साजरा करतो. तो खूपच लहान आहे त्यामुळे मी त्याच्याकडून गिफ्ट घेत नाही तर त्याला गिफ्ट देते. तो माझी कॉमेडी पाहण्यासाठी ‘द ड्रामा कंपनी’ च्या सेटवर येत असतो. त्याला माझी कॉमेडी पाहून खूप मजा येते. 

 * कृष्णा भारद्वाज
‘तेनालीराम’ या मालिकेत तेनालीची भूमिका करणारा अभिनेता कृष्णा भारद्वाज म्हणतो की,‘ नाते ही रक्ताचे नाही, तर मनापासून मानलेले निभवले जातात. खरंतर माझी कु णी सखी बहीण तर नाही पण गेल्या १५ वर्षापासून मी मुंबईत एकटा राहतो. मुंबईतील माझ्या घरी जेवण बनवणारी निशाजी आहे. जी मला प्रत्येक वर्षी राखी बांधते. मी तिला गिफ्ट देखील देत असतो. यावर्षी जर मी तेनालीराम या शोची शूटिंग करत असेल तर नक्कीच मी शूटिंगमधून वेळ काढून निशाकडून राखी बांधून घेईल. तसेच गिफ्टच्या रूपात मी तिला पैसे देण्याचा विचार केला आहे. ज्यामुळे तिच्या मुलीच्या शिक्षणात काही मदत होईल. 

                                    

 * दिशा परमार
‘वो अपना सा’ या मालिकेत जान्हवीची भूमिका करणारी दिशा परमार म्हणते,‘ मी दरवर्षी माझ्या भावासोबत रक्षाबंधन सेलिब्रेट करत असते. खूप ग्रेट मेमरीज माझ्यासोबत आहेत. मी आजही एखाद्या लहान मुलीप्रमाणे राखीच्या सणाची वाट पाहत असते कारण मला यादिवशी खुप सारे गिफ्टस मिळणार असतात, हे मला माहितीये. लहानपणी माझा भाऊ मला चॉकलेटस देत असायचा. आता तो मला पैसे ओवाळणी म्हणून देतो.

                                    

* गुरदीप कोहली
 सेठजीची भूमिका सकारणारी गुरदीप कोहली म्हणते,‘ मला सख्खा भाऊ नाही पण, मी राखीचे सेलिब्रेशन दरवर्षी सेलिब्रेट करते. माझ्या चुलत भावांना मी राखी बांधते आणि त्यांच्याकडून भरपूर सारे गिफ्टस देखील ओवाळणी म्हणून घेते. आता मी दोन मुलांची आई असून माझा मुलगा आणि मुलगी हे देखील मोठया प्रमाणात घरी राखी सेलिब्रेशन करतात. 
Web Title: Learn how celebrities celebrate the celebrations of TV celebrations ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.