Learn about Bong connections with Sushmita Mukherjee and Megha Chakraborti | सुश्मिता मुखर्जी आणिमेघा चक्रबोर्तीसोबतचे जाणून घ्या बाँग कनेक्शन!

बंगाली लोक सर्वांत मोठे फूडी असतात आणि अशी आवड असलेल्यांसोबत त्यांचे छान जमते.अभिनेत्री सुश्मिता मुखर्जी आणि मेघा चक्रबोर्ती ह्या दोघी एकाच शहरातून म्हणजेच कोलकात्याचा असून त्या दोघींना पदार्थांवर ताव मारायला आवडतो. सुश्मिता म्हणाली,“मेघा अतिशय गोड मुलगी आणि उत्तम अभिनेत्री आहे. मला अगदी पहिल्या दिवसाच्या चित्रीकरणापासून ती आवडली. आम्ही दोघीही बंगाली असल्यामुळे आमच्यात खूप कमी वेळात मैत्रीही झाली.

आम्ही अनेकदा पारंपारिक पदार्थ सेटवर घेऊन येतो आणि तिने ते नीट खावेत याकडे माझे लक्ष असते.तिला तिच्या आईची खूप आठवण येते हे ती मला अनेकदा सांगते आणि मग मी तिची छान काळजी घेण्याचा प्रयत्न करते. मला कोलकात्याची खूप आठवण येते कारण मला तिथे माझ्या घरी जायला वेळच मिळत नाही आणि मेघासोबत वेळ घालवायला मला खूप छान आणि अगदी माझ्या घरी असल्यासारखं वाटतं.” सुश्मिता मुखर्जी स्टारप्लसवरील कृष्णा चली लंदनमध्ये बुआ जी (कृष्णाची आत्या) ची भूमिका करत असून या मालिकेत मेघा चक्रबोर्ती नायिका असून त्यांचे ऑनस्क्रीनही रोचक नाते आहे.बुआजी कायम कृष्णाच्या मागे लग्नासाठी आग्रह करत असून त्यांचे कृष्णावर खूप प्रेम आहे आणि तिचे सगळे चांगले व्हावे असे त्यांना वाटते.राधेसोबत कृष्णाने लग्न करावे यासाठी तिची मनधरणी त्या करतात पण कृष्णा कायमच नकार देते.

‘कृष्णा चली लंडन’ या नव्या मालिकेत कृष्णाची भूमिका रंगविणारी अभिनेत्री मेघा चक्रबोर्ती हिने नुकतेच बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान याच्याबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम उघड केले. इतकेच नव्हे, तर एक दिवस आपल्याला त्याची नायिका म्हणून चित्रपटात भूमिका साकारावयाची आहे, असे आपले स्वप्न असल्याचेही तिने सांगून टाकले! मेघा म्हणाली, “मी लहानपणापासूनच शाहरूखची प्रचंड मोठी चाहती आहे. मी त्याचा प्रत्येक चित्रपट पाहिला असून त्याचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. मला एक दिवस त्याच्या चित्रपटात त्याची नायिका बनायचं आहे.त्याच्या बहुतांशी नायिका जशा सुळसुळीत साड्या नेसतात, तशी साडी नेसायची आहे आणि त्याच्याबरोबर एका रोमँटिक गाण्यावर नृत्यही करायचं आहे. मला त्याचं व्यक्तिमत्त्वही आवडतं आणि तो आपल्या सहनायिकांना ज्या आदराने वागवितो,तेसुध्दा मला खूप आवडतं. तो एक प्रतिभावान अभिनेता असून तो कोणतीही भूमिका अगदी सहज आणि उत्कृष्टपणे साकार करू शकतो.”

Web Title: Learn about Bong connections with Sushmita Mukherjee and Megha Chakraborti
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.