'In-laws' actress 'Agneepera' will be in the series, due to bold photoshoot | 'ससुराल सिमर का'मालिकेतील ही अभिनेत्रीची 'अग्नीफेरा' मालिकेत होणार एंट्री,बोल्ड फोटोशूटमुळे आली होती चर्चेत

'ससुराल सिमर का'मध्ये संस्कारी बहूच्या भूमिकेतअभिनेत्री ज्योत्स्ना चांदोला झळकली होती. मालिकेत तिची भूमिका थोडी नेगिटीव्ह असली तरीही रसिकांनी ज्योत्स्नाने साकारलेली ती भूमिका चांगली पसंती दिली होती. आता ज्योत्स्ना पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे  ज्योत्स्नाच्या चाहत्यांना छोट्या पडद्यावर बघण्याची जी हुरहूर होती ती आता लवकरच क्षमणार आहे.कारण  अग्नीफेरा या मालिकेत ज्योत्स्नाची एंट्री होणार आहे. मालिकेत तिच्या एंट्रीने एख नवीन वळण रसिकांना पाहायला मिळणार आहे. वयापेक्षा बर्‍याच मोठ्या असणार्‍या ब्रिजवन सिंह (अनुरागचे काका) यांच्यासह लग्न करून सिंह यांच्या परिवारात प्रवेश करणार्‍या एक तरूण महत्त्वाकांक्षी मुलगी 'रज्जो'च्या भूमिकेत लवकरच ज्योत्स्ना चांदोला दिसणार आहे. सिंह परिवारात तुलनेत गोष्टी चांगल्या चालू असताना, ज्योत्स्नाच्या रज्जो या पात्रामुळे या कथेमध्ये एक वेगळेच वळण आल्यामुळे मालिका पाहणे रंजक ठरणार आहे. रज्जो ही एक अशी हेकेखोरे स्त्री आहे अतिशय जहाल भाषेचा वापर करत बोलते.आपले मत मांडायला ती अजिबात घाबरत नाही आणि लोकांना त्यांची जागा दाखवून देणे तिला योग्य प्रकारे जमते. थोडक्यात सांगायचे झाले तर, 'रज्जो' हे असे मनोरंजक पात्र आहे जे दबंग रज्जो म्हणून स्वतःला सादर करणार आहे.ज्योत्स्नाने या बातमीला दुजोरा दिला असून उत्साहाने सांगितले, “अग्नीफेरामधील माझ्या रज्जोच्या भूमिकेसाठी खूप उत्साही आहे. या मालिकेचा मी भाग व्हावा यासाठी जेव्हा निर्माते माझ्याकडे आले आणि मला जेव्हा ही भूमिका ऐकवण्यात आली तेव्हाच मला ती आवडली.रज्जो नावावरूनच व्यक्तिरेखा भारदस्त असणार आहे. ही अतिशय बिनधास्त असून तिचे व्यक्तिमत्त्व भक्कम आहे, ती महत्त्वाकांक्षी, हुशार,स्वतःची मते मांडणारी, आणि  त्याचबरोबर अतिशय विनोदी आहे.” “मालिकेतील माझी ही भूमिका नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.खूप सार्‍या नाट्यमय घडामोडी घेऊन सिंह कुटुंबात उलथापालथ करण्यासाठी मी सज्ज असल्याचे'' ज्योत्स्नाने सांगितले.मालिकेतील या नव्या प्रवेशामुळे,सिंह परिवारातील रज्जोच्या येण्यामागे कोणते गुढ दडले असणार याचा उलगडा मालिकेत होणार आहे.

Web Title: 'In-laws' actress 'Agneepera' will be in the series, due to bold photoshoot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.