Latest PhotShoot: Mouni Lucky predicts that she'll be able to look again | Latest Photshoot:मौनी रॉयचा पुन्हा दिसला घायाळ करणार अंदाज

सध्याचं सौंदर्यं पहिल्यापेक्षा अधिक घायाळ करणार असल्याचे पाहायला मिळत आहे.मौनीचे सुंदर तर दिसतेच आहे शिवाय तिच्या अदा तितक्याच बोल्ड आणि अंदाजही हॉट असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मौनीचे एक फोटोशूट समोर आले होते. या फोटोशूटमध्ये तिचा बोल्ड, हॉट आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळात आहे.या फोटोशूटचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोशूटने सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत.मालिकेमुळे घराघरात पोहचलेल्या मौनी आता लवकरच रूपेरी पडदा गाजवण्यासाठीही सज्ज आहे.अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'गोल्ड'मधून मौनी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय अशी अभिनेत्री आहे जी सतत चर्चेत राहत असते काही ना काही कारणाने तिच्या बद्दल नवीन बातम्या येतच राहतात. 'गोल्ड' सिनेमानंतर मौनी एकामागून एक सिनेमा साइन करत आहे. अक्षयकुमारच्या गोल्डनंतर रणबीर कपूर आणि आलिया भटच्या ब्रह्मस्त्र सिनेमातही ती दिसणार आहे.मौनीने ‘क्योंकी साँस भी बहु थी’ या मालिकेपासून टीव्ही करिअरला सुरूवात केली होती.त्यानंतर ‘जरा नच के दिखा’मध्ये कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. ‘देवों के देव महादेव’, ‘बिग बॉस 8’अशा अनेक शोमधून मौनीने स्वत:ची छाप पाडली होती. त्या सगळ्या भूमिकांमुळेच आज मौनीला छोटा पडदा ते रूपेरी पडदा हा पल्ला गाठणे शक्य झाले आहे. मौनी इथवरच थांबली नाही.मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोनं करत ती यशाच्या पाय-या चढत राहिली.त्यामुळेच आता ती वेबसिरीजमध्येही झळकणार आहे.‘मेहरुनिसा‘नावाच्या वेबसिरीजमध्ये ती पाहायला मिळणार आहे.केन घोष या वेबसिरिजचे दिग्दर्शन करणार आहे.सध्या मौनीला अनेक टीव्ही मालिका आणि पौराणिक मालिकांसाठीही ऑफर्स येत आहेत. मात्र आता तिला सिनेमा करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. यासाठी तिच्याकडे येणा-या  अनेक टीव्ही ऑफर्सना नकार दिला आहे. ठराविक  भागांची मालिका किंवा रिअॅलिटी शो असणार तरच करणार असल्याचे कळतंय.आता मौनी रॉयची इमेजही बदलली आहे.त्यामुळे त्यामुळे मौनीला मालिकांमध्ये अडकून न राहता सिनेमासाठी काम करायचे आहे. काहीही झाले तरी पौराणिक मालिकांमध्ये काम करायचे नाही असे तिने ठरवले आहे.पौराणिक मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली मौनी रॉय आता बॉलिवूडमध्ये हिरोईन बनत आपली नवी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्न करत आहे.Web Title: Latest PhotShoot: Mouni Lucky predicts that she'll be able to look again
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.