Lara Datta gave a message to women in 'High Future Dance' | 'हाय फिव्हर डान्स का नया तेवर'मध्ये लारा दत्ताने दिला नारी शक्तीचा संदेश

केवळ सहभागी झालेल्या जोड्याच नाही तर त्यांच्यात असलेल्या बंधातून विलक्षण परफॉर्मन्ससह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठीचा नवा रिअॅलिटी शो,हाय फिव्हर...डान्स का नया तेवर सज्ज आहे.ऑडिशन्स दरम्यान,अशाच एका जोडीमुळे आताच परीक्षक म्हणून पदार्पण केलेल्या लारा दत्ताची एक वेगळी बाजू पाहायला मिळाली असून संपूर्ण ताकदीनिशी तिने नारी शक्तीला पाठिंबा दिला आहे.

सेटवर आपला अप्रतिम परफॉर्मन्स देऊन झाल्यानंतर छोट्याशा दोन स्पर्धक अनाया आणि अनिशा यांनी आपली गोष्ट ऐकवली. सुरुवातीला आपल्याला पाच मुली आहेत आणि एकही मुलगा नाही यामुळे आपण कसे निराश झालो होतो हे अनायाच्या वडिलांनी सांगितले,पण अनयाची प्रतिभा आणि तिच्या चिकाटीकडे बघता राष्ट्रीय वाहिनीवर येण्याची संधी आपल्या मुलीमुळेच आपल्याला मिळाली असे त्यांना वाटते,असे त्यांनी पुढे सांगितले.यानंतर परीक्षक आणि प्रेक्षकांनी अभिमानाने मनापासून त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली. त्यांच्या या कथेमुळे आणि मुलांसारखीच समृद्धी मुली घरी आणतात हा विश्वास आणि लोकांचे मन बदलण्याची शक्ती नृत्यामध्ये आहे हे बघूनदेखील सर्वच परीक्षक भारावून गेले.

त्यावेळी आपल्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रसंग उपस्थितांसमोर लारा दत्ताने सांगितला, “माझ्या कुटुंबात सर्व मुली आहेत आणि माझ्या दोन मोठ्या बहिणींनंतर, मुलासाठी का प्रयत्न करू नये असे माझ्या पालकांना वाटले आणि माझा जन्म झाला (हसून). खरे तर माझ्या संपूर्ण कुटुंबात महिलाच आहेत. माझे वडील एअर फोर्समध्ये पायलट होते आणि मुलगाच परंपरा चालवू शकतो असे, आपल्या देशात प्रत्येकाला वाटते. पण भारतातील एअरफोर्समध्ये पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट म्हणून माझ्या बहिणीने नाव कमावले आणि मिस युनिव्हर्स क्राऊन भारतात परत आणणारी भारतातील मी दुसरी महिला ठरले होते.”

दत्ता भगिनींनी नक्कीच आपल्या पालकांचा सन्मान उंचावला आहे आणि सिद्ध केले आहे की,कुटुंबाचा वारसा पुढे नेणे हे केवळ मुलांचेच काम नाही.प्रत्येक पालक आणि उपस्थित स्पर्धकांच्या पालकांना लाराने नक्कीच नारी शक्तीचा अनुभव दिला आहे.हाय फिव्हर त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करत आहे आणि देशातील मुली आणि महिलांना अधिक शक्ती मिळो हीच आमची सदिच्छा.
Web Title: Lara Datta gave a message to women in 'High Future Dance'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.