'Lal Ishq' in the role of division pleasure! | 'लाल इश्क'मध्ये विभा आनंद दिसणार या भूमिकेत!

'लाल इश्क' मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. विविध भागांमधील या मालिकेत रसिकांना टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत.रोमान्स आणि थ्रीलरचा अप्रतिम मेळ साधत या मालिकेत 'प्रेमकथेचा गोड शेवट' या ठरलेल्या उक्तीवरच प्रश्नचिन्ह लागणार आहे. कारण या मालिकेत काही अत्यंत रंजक अशा प्रेमकथांमधील एक दैवी चमत्कारांचा भाग असणार आहे.या शोच्या एपिसोडिक संकल्पनेचा विचार करता &टीव्हीने आपल्या पुढील एपिसोडसाठी विभा आनंदला मुख्य भूमिकेसाठी निवड केले असून त्याची निर्मिती कबीर सदानंदने केली  आहे. 

विभाने आपल्या करिअरमध्ये अनेक व्यक्तिरेखा आणि उत्तम अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहे.'लाल इश्क' ही मालिकाही तिच्या मालिकांच्या यादीत गणली जाणार आणि एक वेगळा अनुभव मिळणार त्यामुळे ती खूप खुशही आहे. 'लाल इश्क'मधील भूमिकेबद्दल आणि आपला अनुभव व्यक्त करताना विभा म्हणाली, “मी &टीव्हीसोबत यापूर्वीही बेगुसराईमध्ये काम केले आहे. त्यामुळे एका नवीन शोसाठी त्याच वाहिनीसोबत काम करणे ही आनंदाची गोष्ट असेल.” आपल्या लाल इश्कमधील व्यक्तिरेखेबद्दल बोलताना विभा सांगतेकी, “अनेक घटनांमध्ये मुलीला आपल्या इच्छा आणि स्वप्नांपासून फारकत घ्यावी लागते. माझी लाल इश्कमधील व्यक्तिरेखा त्याच परिस्थितीतून जाते आणि आपल्या इच्छा तसेच सत्य यांच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करते. मला कायमच प्रेमकथा आवडत आल्या आहेत आणि 'लाल इश्क' ही मी भूतकाळात केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. या शोची पटकथा वेगळी आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा राहील हे नक्की.” 

मुळात विभा 'बालिका वधू' मालिकेमुळे प्रकाशझोतात आली होती.सुगना या भूमिकेमुळे ती आजही विभापेक्षा सुगना या नावानेच जास्त ओळखली जाते.या मालिकेनंतर तिने स्वतःची इमेज बदलण्याचाही प्रयत्न केला.मध्यंतरी तिने हॉट फोटोशूट करत बोल्ड इमेज फोटो शेअर केले होते.देसी लूकमधली सुगनाला बोल्ड इमेजमध्ये पाहून तिच्यावर रसिकांनी संमिश्र प्रतिक्रियाही दिल्या होत्या.मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा विभा वेगळ्याच भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार म्हटल्यावर तिची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरते का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
Web Title: 'Lal Ishq' in the role of division pleasure!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.