Lakshmi weddings to be celebrated in 'Lakshmi Sadaiye Mangalam' series! | 'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये रंगणार लक्ष्मीचा विवाहसोहळा !

नुकतीच सुरु झालेली लक्ष्मी सदैव मंगलम् ही मालिका सध्या बरीच चर्चेमध्ये आहे. विशेषकरून प्रेक्षकांना प्रत्येक भागामध्ये दिसणारे गावाचे सौंदर्य आणि मालिकेमधील कलाकार. गावामध्ये वाढलेली अवखळ, लाघवी, प्रेमळ अशी लक्ष्मी म्हणजे समृद्धी केळकर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या मालिकेमध्ये मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे, आर्वी म्हणजेच सुरभी हांडे प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसत आहेत यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता मालिकेमध्ये लक्ष्मीच्या लग्नाचा विवाहसोहळा रंगणार आहे. शुभ पावलांनी गावात येऊन सगळ्यांचीच लाडकी बनलेल्या या लक्ष्मीच्या लग्नाची तयारी म्हणजे मंडप लावणे, मेहेंदीची तयारी मोठ्या उत्साहात गावामध्ये सुरु झाली आहे. लक्ष्मीची आजी तिला लहानपणापासून सांगत असलेल्या स्वप्नातला राजकुमार आता खरोखरच तिच्या आयुष्यात येणार आहे.आपलं आयुष्य आता हा राजकुमार प्रेमाने बहरुन टाकणार अशा स्वप्नांमध्ये लक्ष्मी आहे आणि मोठ्या आनंदाने लग्नाची तयारी करत आहे. 
 

जशी प्रत्येक मुलीची इच्छा असते कि, तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळावा... आपल्याला आधार देणारा, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात असावा अशी इच्छा लक्ष्मीची देखील आहे. लक्ष्मीच्या हाताला आता लवकरच मेहेंदी लागणार आहे ... मंडप सजणार आहे...लक्ष्मीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजे मल्हारचा फोटो पाहिला आहे, आणि ते एकमेकांशी फोनवर बोलले देखील आहेत परंतु या दोघांची भेट होणं मात्र राहून गेले आणि त्याला कारण म्हणजे मामीची कारस्थानं. मल्हारला मात्र या सगळ्याची काहीच कल्पना नाहीये या सगळ्या गोष्टींशी तो अनभिज्ञ आहे. तर दुसरीकडे मामी आणि श्रीकांतचा काही वेगळाच हेतू आहे. श्रीकांतला पहिल्यापासूनच लक्ष्मीशी लग्न करण्याची इच्छा आहे तर गावामधील अविनाश जे राजकारणामध्ये आहेत त्यांना स्वत:च्या मुलाचे लग्न लक्ष्मीशी करून द्यायचे आहे.

 

या सगळ्या परीस्थीशी अनभिज्ञ अवखळ, सगळ्यांवर नि:स्वार्थपणे प्रेम करणारी, स्वछंदी लक्ष्मी जी आयुष्यभर ओंजळीत निखारे आणि ओठी हसू घेऊन वावरली तिच्या नशिबी मल्हार खरोखर सुखाची चाहूल घेऊन येईल का ? तिचं लग्न कोणाशी होईल मल्हार, श्रीकांत कि अविनाशचा मुलगा ? या सगळ्या निरुत्तरित प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना याच आठवड्यामध्ये मिळणार आहेत.
Web Title: Lakshmi weddings to be celebrated in 'Lakshmi Sadaiye Mangalam' series!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.