'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर ‘लागीरं झालं जी'मधला 'हा' कलाकार करणार कॉमेडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 04:14 PM2019-03-26T16:14:36+5:302019-03-26T16:23:05+5:30

लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेमधील टॅलेंटची भूमिका साकारून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता महेश जाधव चला हवा येऊ द्या च्या मंचावर कॉमेडी करणार आहे.

Lagir jhale ji fame mahesh jadhav will be in chala hava yeu dya programmer | 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर ‘लागीरं झालं जी'मधला 'हा' कलाकार करणार कॉमेडी

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर ‘लागीरं झालं जी'मधला 'हा' कलाकार करणार कॉमेडी

googlenewsNext

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमात नावीन्य म्हणून चला हवा येऊ द्या चे ‘होउ दे व्हायरल’ पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आणि या यशस्वी पर्वा नंतर आता पुढे काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असताना याचं उत्तर देखील प्रेक्षकांना होऊदे व्हायरलच्या महाअंतिम सोहळ्यात मिळालं.

 

लवकरच चला हवा येऊ दे च्या मंचावर झी मराठीवरील लाडके कलाकार कॉमेडी करणार आहेत. लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेमधील टॅलेंटची भूमिका साकारून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता महेश जाधव चला हवा येऊ द्या च्या मंचावर कॉमेडी करणार आहे.

कॉमेडी करून तो प्रेक्षकांना किती मनोरंजित करेल आणि मालिकेतील टॅलेंट कॉमेडीमध्ये किती टॅलेंटेड आहे हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. लवकरच प्रेक्षकांना या पर्वात टॅलेंटला पाहता येईल.

Web Title: Lagir jhale ji fame mahesh jadhav will be in chala hava yeu dya programmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.