Kunal Karan Kapoor will appear in his own Saa! | कुणाल करण कपूर दिसणार 'वो अपना सा'मध्ये!

झी टीव्हीवरील लोकप्रिय कल्पित मालिका वो अपना सा ने आतापर्यंत काही थरारक क्षण सादर करून प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी अर्जुनला (सुदिप साहिर) गायब झालेले बघितले आहे तर जिया (दिशा परमार) त्याला शोधण्यासाठी जंगजंग पछाडते. त्याचवेळी, निशा (मानसी साळवी) तुरुंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न चालूच ठेवते. हे नाट्य उलगडत असतानाच ह्या कार्यक्रमाच्या प्रबळ अनुयायांना आता प्रचंड आश्चर्याचे धक्के बसणार आहेत कारण आता प्रवेश करणार आहे एक नवीन पात्र, कृष्णा शेखावत आणि कृष्णाच्या भूमिकेत असणार आहे मोहक अभिनेता कुणाल करण कपूर, जो तीन वर्षांच्या कालावधीनंतर दूरचित्रवाणीवर परतत आहे. दूरचित्रवाणीवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रसिद्ध झालेल्या ह्या कुशल अभिनेत्याला वो अपना सा मध्ये एका महत्वाच्या भूमिकेसाठी घेण्यात आले आहे.

कृष्णाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक कठोर, कडक शिस्तीचा पोलीस अधिकारी आहे जो त्याच्या धैर्य व प्रखर व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असतो. तो स्पष्टवक्ता असतो आणि दिलेल्या शब्दाला जागणाराही असतो. अर्जुनच्या गहाळ होण्याच्या प्रकरणात जियाची मदत करताना तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला ती आवडू लागलेली असते. तिकडे, तुरुंगातून बाहेर पडण्याच्या निशाच्या योजनेलाही तो जणू पाठिंबा देत असतो. तो कोणाच्या बाजूने आहे? आणि त्याचे खरे हेतू काय आहेत? त्यांच्या भूमिकेविषयी बोलताना कुणाल करण कपूर म्हणाला, “मी बराच काळ दूरचित्रवाणीपासून दूर राहिलो आहे परंतु एका मनोरंजक कार्यक्रमातून आणि अशा भूमिकेतून पुनरागमन करताना छान वाटत आहे. एका कल्पित कार्यक्रमाच्या सेटवर पुन्हा उपस्थित राहताना वाटणारा उत्साह मला आवडत आहे आणि मी माझ्या भूमिकेत खोलवर शिरण्यासाठी जाणीवपूर्वक अधिक वेळ व्यतीत करत आहे. मी पहिल्यांदाच एका पोलीसाची भूमिका करत आहे आणि माझ्या भूमिकेविषयी आणि एकूणच व्यक्तिमत्वासंबंधी प्रयोग करण्यास मी खूपच उत्सुक आहे. त्याचबरोबर, माझी पूर्वीची सहकलाकार मानसी साळवी हिच्याबरोबर पुन्हा एकत्र येताना मला आनंद वाटत आहे. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि एक जवळची मैत्रीण आहे. मी ह्या नवीन प्रवासाची वाट पाहत आहे आणि एका पूर्णपणे नवीन अवतारासह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास उत्सुक आहे.''
Web Title: Kunal Karan Kapoor will appear in his own Saa!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.