KULPHI KUMAR BAJWAL BARN SUBTTY TO BE ANNEAR? | ​कुल्फी कुमार बाजेवालामध्ये बरूण सोबतीची होणार एंट्री?

बरुण सोबतीला इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेचा दुसरा सिझन देखील काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेत देखील बरुणनेच महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण या इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेच्या दुसऱ्या सिझनइतकी लोकप्रियता पहिल्या सिझनला मिळाली नसल्याने काहीच महिन्यात या मालिकेला आपला गाशा गुंडाळावा लागला. 
इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेचा दुसरा सिझन काहीच महिन्यात संपल्यामुळे बरुण सोबतीच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. पण बरुणच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. स्टार प्लस वाहिनीवरीलच एका मालिकेत बरुणची आता लवकरच एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेत बरुण प्रेक्षकांना एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.
स्टार प्लसवरील कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेतील रॉकस्टारच्या भूमिकेत असलेल्या टेलिव्हिजन हार्टथ्रॉब मोहित मलिकने सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेचा तो आयकॅन्डी बनला आहे. या मालिकेची कथा, या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. आता या मालिकेत छोट्या पडद्यावरील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचा प्रवेश होणार आहे. या मालिकेत काहीच दिवसांत प्रेक्षकांना बरूण सोबती पाहायला मिळणार आहे.
बरुण सोबती इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत सिकंदर म्हणजेच मोहित मलिकचा स्पर्धक म्हणून एंट्री करणार आहे. तो या मालिकेत अमायराच्या संगीत शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो सुद्धा एक स्ट्रगलिंग रॉकस्टार असून त्याच्या गायनामुळे तो लवकरच लोकप्रिय होणार आहे. बरूण करिअरमध्ये प्रथमच रॉकस्टारची भूमिका साकारत असल्याने या भूमिकेसाठी तो चांगलाच उत्सुक आहे.
कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेच्या निर्मात्या गुल खान बरुण सोबतीला त्यांचा लकी चार्म मानतात. त्यामुळे त्यांना या शोमध्येसुद्धा तो हवा होता. त्यामुळे त्यांनीच बरुणला या भूमिकेबाबत विचारले असून त्याच्यासोबत या भूमिकेबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

Also Read : ​‘कुल्फीकुमार बाजेवाला’च्या चित्रीकरणाच्यावेळी श्रृती शर्माला आली चक्कर
Web Title: KULPHI KUMAR BAJWAL BARN SUBTTY TO BE ANNEAR?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.