Kulfi met her biggest fan | कुल्फी भेटली तिच्या सगळ्‌यात मोठ्या फॅनला

कलाकार आपल्याला मनोरंजन देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात आणि याबदल्यात त्यांना अपेक्षा असते ती केवळ प्रेमाची. छोटी आक्रिती शर्मा कुल्फीच्या रूपात घरांघरांत पोहोचली आहे आणि तिची एक चाहती तिला भेटण्यासाठी थेट फरीदाबादहून मुंबईला आली.

ह्या ३ वर्षीय शनाया अरोराने ह्या शोमधील टायटल ट्रॅक पेट बिचारा गाताना टि्‌वटरवर व्हिडीओ पोस्ट केला होता. आक्रितीने तो व्हिडीओ पाहताच शनायाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा शनाया आक्रितीला भेटण्यासाठी आपल्या पालकांसोबत थेट फरीदाबादहून विमानाने फादर्स डे च्या निमित्ताने कुल्फी आणि सिकंदर यांना आश्चर्यचकित करण्यासाठी आली. “माझी मुलगी शनाया ही कुल्फीची खूप मोठी चाहती आहे. जेव्हा जेव्हा कुल्फी ऑनस्क्रीन गाते, तीसुद्धा  तिच्यासोबत गाते. याशोने मला माझ्या मुलीच्या जवळ आणले आहे आणि ह्यासाठी मी आक्रिती आणि मोहित यांचे आभार मानतो.” असे शनायाचे वडिल सचिन अरोरा म्हणाले. “शनाया आम्हांला भेटायला आली हे पाहून मला खूपच आनंद झाला. मी तिला आणि तिच्या परिवाराला स्वतः अख्खा सेट नीट दाखवला आणि मग आम्ही एकत्र पेट बिचारा हे गाणे गायले. तुमचे काम प्रेक्षकांना आवडत आहे आणि ते त्यांच्या आयुष्यात काही बदल घडवत आहे हे खूप छान आहे. जेव्हा आम्ही शनायाचा व्हिडीओ पाहिला तेव्हा आम्हांला तिला भेटावेसे वाटले. टीम हे शक्य करून दाखवेल हे आम्हांला खरंच वाटले नव्हते. मी अरोरा परिवाराचे आभार मानतो की ते फरीदाबादहून फक्त
आम्हांला भेटायला आले आणि तेही फादर्स डे ला.” आक्रिती शनायाला पाहून खूप उत्साहात होती.

कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेत लव्हली आणि सिकंदर या व्यक्तिरेखा अनुक्रमे अंजली आनंद आणि मोहित मलिक साकारत आहेत. मालिकेत या दोन कलाकारांमध्ये पती-पत्नीचे नाते असले तरी त्यांचे एकमेकांशी पटत नसल्याचे मालिकेत दाखविण्यात आले आहे तर कुल्फी ही अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मिश्किल आणि निरागस स्वभावाची, सदा हसतमुख असणारी मुलगी आहे.

 
Web Title: Kulfi met her biggest fan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.