kulfi kumar bajewala fame Mrinmai Kolwalkar will appear in the princess's get-up | मृण्मयी कोलवलकर दिसणार राजकन्येच्या गेटअपमध्ये
मृण्मयी कोलवलकर दिसणार राजकन्येच्या गेटअपमध्ये

ठळक मुद्देमृण्मयी आहे फिटनेस फ्रीक

स्टार प्लस वाहिनीवरील कुल्फी कुमार बाजेवाला मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी कोलवलकर तेवर विशाल आदित्य सिंगची गर्लफ्रेंज मिटींची भूमिका करते आहे. या मालिकेतील आगामी भागात राजकन्येच्या अवतारात मृण्मयी दिसणार आहे. 


कुल्फी कुमार बाजेवाला मालिकेत तेवरची गर्लफ्रेंड आणि लव्हली अंजली आनंदची बेस्ट फ्रेंड मिंटी हिचा साखरपुडा आता तेवरसोबत होत
असून तिला त्यांच्या भूतकाळाविषयी काहीच माहिती नाही, असे दाखवले आहे. या साखरपुड्याच्या चित्रीकरणासाठी मृण्मयीने राजकन्येचा लूक केला आहे. याबाबत मृण्मयी म्हणाली की, “साखरपुड्‌यासाठी माझा राजकन्येचा लूक असून तो माझ्या नेहमीच्या लूक्सपेक्षा अगदी वेगळा आहे आणि मी त्याबद्दल अतिशय उत्साहात आहे. त्या लूकमध्ये मला अगदी राजकन्येसारखेच वाटले.”
मृण्मयी फिटनेस फ्रीक असून स्वतःला फिट ठेवायला तिला आवडते. ती दररोज चित्रीकरणाच्या आधी किंवा नंतर न चुकता व्यायाम करते.
कुल्फीकुमार बाजेवाला मालिकेत एका मुलीच्या संगीतमय जीवन प्रवासाची कहाणी सादर करण्यात आली आहे.या मालिकेत मोहित मलिक, अंजली मलिक, आकृती शर्मा यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड भावत आहेत. या मालिकेत नुकतेच नामवंत अभिनेत्री शफाक नाझने एन्ट्री केली आहे. या मालिकेत आणखीन नवीन वळण येणार असून त्यासाठी ही मालिका पाहावी लागेल.


Web Title: kulfi kumar bajewala fame Mrinmai Kolwalkar will appear in the princess's get-up
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.