Kranti Redkar and Prasad will do oak! Industry ', to meet the audience soon to arrive from a comedy show | क्रांती रेडकर आणि प्रसाद ओक करणार 'न.स.ते. उद्योग', कॉमेडी शोमधून लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

उत्तम कॉमेडी आणि मनोरंजन देणारा झी टॉकीज चा कार्यकम नसते उद्योग आता नव्या रुपात,नव्या ढंगात आणि नवीन वेळेवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी नसते उद्योगच्या मंचावर अवलिया कलाकार करणार नुसते उद्योग आणि त्याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील मराठी सिनेमाला महत्व देऊन त्याला एक मोठं व्यासपीठ देण्यासाठीच झी टॉकीज ने हे अनोखे पाऊल उचलले आहे.हा कार्यक्रम मनोरंजन तर देणारच पण त्याबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील प्रदर्शित होणारे नवनवीन सिनेमे आणि त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत.त्यांच्यासोबत मजामस्ती करणार आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दोन उत्कृष्ट कलाकार आणि निवेदक क्रांती रेडकर आणि प्रसाद ओक. दोन निवेदक एकत्र असलेला हा पहिलाच मराठी चॅट शो असू शकेल.या कार्यक्रमात होणारे अॅक्ट हे त्या वेळी आलेला सिनेमा प्रमोट करण्यास मदत करेल.प्रसाद ओक आणि क्रांती रेडकर यांच्या सोबत मनोरंजन करण्यासाठी अंशुमन विचारे,नम्रता आवटे,प्रभाकर मोरे ,जयवंत भालेराव हे सुद्धा वेगवेगळ्या भूमिकेत झळकणार आहेत.रविवारी होणाऱ्या पहिल्या एपिसोड मध्ये झी स्टुडिओच्या 'गुलाबजाम'या चित्रपटाचे कलाकार प्रेक्षकांना भेटायला येत आहेत.सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नसते उद्योगच्या सेटवर येऊन केलेली मजमस्ती रविवारच्या एपिसोड मध्ये पाहायला मिळेल.

विनोदाची चौफेर फटकेबाजी असलेल्या न.स.ते. उद्योग या कार्यक्रमाच्या पहिला सिझनमध्ये संजय नार्वेकर आणि निलेश दिवेकर,नम्रता आवटे, पंकज पंचारिया, जनार्दन लवंगारे हे विनोदवीर झळकले होते.या कार्यक्रमातून रसिकांना कलाकारांचा धमाल अभिनय,खळखळून हसवणारे संवाद आणि निखळ मनोरंजनाची ट्रीटमुळे रसिकांचीही पसंती मिळाली होती.त्यामुळे पुन्हा एकदा नवा उद्योग करत या विनोदवीरही न.स.ते. उद्योग हास्याची कारंजी फुलवण्यासाठी सज्ज झाले आहेत.तसेच या दुस-या सिझनमध्ये आणखी एक मोठे पाऊल टाकत न.स.ते. उद्योग हा एक हलका फुलका विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.
Web Title: Kranti Redkar and Prasad will do oak! Industry ', to meet the audience soon to arrive from a comedy show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.