Know what happened in the series ie Ajit Chiston, telling about his true life | ​जाणून घ्या लागिरं झालं जी या मालिकेतील अज्या म्हणजेच नितिश चव्हाण काय सांगतोय त्याच्या खऱ्या आयुष्यातील शितलीविषयी

छोट्या पडद्यावर सध्या लागीरं झालं जी ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेचं दिवसेंदिवस रंजक होत चाललेलं कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. फौजींच्या जीवनावरील आधारित या मालिकेत अज्या म्हणजेच अजिंक्य आणि शीतली अर्थात शीतलची लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळाली असून त्या दोघांचे नुकतेच लग्न झाल्याचे देखील दाखवण्यात आले आहे. अजिंक्य आणि शीतल रसिकांच्या घराघरात लोकप्रिय झाले आहेत. शीतल ही भूमिका अभिनेत्री शिवानी बोरकर हिने साकारली आहे. तर अजिंक्यची भूमिका नितीश चव्हाण याने साकारली आहे. या मालिकेतील अज्या आणि शितलीची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील नितिश आणि शिवानी दोन्ही प्रेक्षकांचे प्रचंड लाडके झाल्यामुळे या दोघांच्या खऱ्या आयुष्याविषयी जाणून घ्यायची इच्छा प्रेक्षकांना नेहमीच लागलेली असते.
लागिरं झालं जी या मालिकेत अजिंक्यच्या आयुष्यात शितली असल्याचे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पण नितिशची खऱ्या आयुष्यातील शितली कोण आहे हे जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. नितिशला त्याच्या खऱ्या आयुष्यातील शितलीविषयी नुकतेच विचारले असता तो सांगतो, सध्या तरी माझ्या आयुष्यात कोणी शितल नाहीये. मी माझ्या करियरवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले असून माझे संपूर्ण लक्ष हे लागिरं झालं जी या मालिकेकडे लागले आहे. त्यामुळे प्रेमात पडण्याचा सध्या तरी माझा विचार नाहीये. 
27 वर्षीय नितिशचा जन्म साताऱ्यात झाला आहे. दापोलीत प्राथमिक शिक्षण, वाईमध्ये उच्चशिक्षण आणि पुढील शिक्षण त्याने पुण्यात पूर्ण केले. नृत्याची त्याला सुरुवातीपासूनच आवड होती. जेननेक्स्ट नावाची त्याने डान्स अकादमीही सुरू केली होती. अभिनयासोबतच नितीश डान्सिंगमुळेही लोकप्रिय आहे.  मी एक खूप चांगला डान्सर असून याच क्षेत्रात मला नाव कमवायचे होते. डान्सिंग या माझ्या पॅशनला माझे करियर बनवायचे होते. पण अभिनयात संधी मिळाल्याने मी या क्षेत्राकडे नकळतपणे वळलो असे नितिश चव्हाण सांगतो.  
Web Title: Know what happened in the series ie Ajit Chiston, telling about his true life
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.