Kiran Kher in 'Miriam Khan: Reporting Live'! | ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’मध्ये अभिनेत्री किरण खेर!

किरण खेर यांच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. किरण खेर लवकरच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. ‘स्टार प्लस’वर लवकरच ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेचे प्रसारण सुरू होणार आहे. यात आठ वर्षांच्या मरियम या मुलीच्या अबोध विश्वाचे दर्शन घडणार असून देश्ना दुगड ही यात मरियमची मध्यवर्ती भूमिका रंगविणार आहे.

या मालिकेत एका पाहुण्या कलाकारची भूमिका रंगविण्यासाठी अभिनेत्री  किरण खेर यांच्याकडे विचारणा करण्यात आल्याचे आमच्या कानावर आले आहे. यात ती दादा हुजुर (एस. एम. झहीर) यांच्या मैत्रिणीची भूमिका साकारणार असून ती त्यांना भेटण्यासाठी मरियमच्या घरी येते. या छोट्या भूमिकेसाठी निर्माते ज्येष्ठ अभिनेत्रीच्या शोधात होते. त्यांनी बऱ्याच कलाकारांची नावे तपासली आणि
शेवटी या भूमिकेसाठी किरण खेर यांची निवड केली. सूत्रांनी या घडामोडींना दुजोरा देताना सांगितले, “किरण खेर यांच्याशी सध्या बोलणी सुरू असून सर्व काही सुरळीत पार पडले, तर त्या लवकरच चित्रीकरणास प्रारंभ करतील.”

'मरियम खान रिपोर्टिंग लाइव' मालिकाचे कथा भोपाळच्या पार्श्वभूमीवर असणार आहे.या मालिकेपूर्वीही देशना 'इस प्यार को क्या नाम दूं' आणि 'बाल कृष्ण'मालिकेत झळकली होती. सध्या अनेक मालिकेत बच्चेकंपनीचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकवेळा बच्चेकंपनीला आपण लहान भूमिका करताना पाहिले आहे.मात्र आता तसे नसून बच्चेकंपनी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या मालिकांना रसिकांचीही चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मालिकांना रसिकांचीही चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह'ही मालिका रसिकांचे मनं जिंकण्यात यशस्वी ठरेल असा निर्मात्यांना विश्वास आहे.

Web Title: Kiran Kher in 'Miriam Khan: Reporting Live'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.