Khatron Ke Khiladi 8: So Hina Khan collapsed weeping? | Khatron Ke Khiladi 8 : म्हणून हिना खानला रडू कोसळले?

टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या 'खतरों के खिलाडी पर्व 8'मध्ये झळकत आहे. खतरनाक स्टंट करताना लग जा गले हे गाणे गात असल्याचा तिचा हा अंदाज रसिकांनाही आवडतोय.या शोमध्ये स्टंट करताना  हिना या शोचा होस्ट रोहित शेट्टीचे फेव्हरेट गाणे गात दिलेला टास्क पूर्ण करत असल्याचे पाहायला मिळाले.या शोच्या माध्यमातून हिना खान तिच्या ख-या आयुष्यात कशी असते हेही रसिकांना जाणून घेता येते तसेच हिनाला गाण्याची आवड असल्याचेही या शोच्यामाध्यमातून रसिकांना कळलंय. त्यामुळे सगळ्या कंटेस्टंटपेक्षा हिनाला रसिकांची जास्त पसंती मिळत आहे. एरव्ही रोहित शेट्टीने दिलेले टास्क तिने हसत हसत पूर्ण केले आहेत.मात्र एका स्टंटवेळी हिना स्वत:ला रोखू शकली नाही आणि टास्क करण्याआधीच रडायला लागली. कोणालाच काही समजेना की हिनाला काय झाले का ती रडतेय? शेवटी तिने सांगितले की, तिला उंदीर आणि किड्यांची खूप भीती वाटते. त्यामुळे दिलेल्या टास्कमध्ये अंगावर उंदीर आणि किडे टाकण्यात येणार यामुळे माझ्या अंगावर शहारे उभे राहिलेत. हे ऐकताच रोहित शेट्टीने तिला हिंम्मत देत दिलेला टास्क करायला तयार केले.येणा-या भागात हिनाने हा टास्क पूर्ण केला की नाही हे पाहणे रंजक असणार आहे.या शोमध्ये हिना व्यतिरिक्त  गीता फोगाट, मनवीर गुर्जर, करन वाही, शांतनु माहेश्वरी, शिवानी डांडेकर, निया शर्मा, हिना खान, रवि दुबे, मोनिका डोगरा, शाइनी दोशी, लोपामुद्रा राउत आणि रित्विक धन्जानी यांचा सहभाग असून स्पेनमध्ये या शोचे शूटिंग करण्यात आले आहे.  
Web Title: Khatron Ke Khiladi 8: So Hina Khan collapsed weeping?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.