कौन बनेगा करोडपतीच्या आगामी सिझनसाठी या दिवसापासून करता येणार रजिस्ट्रेशन...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 06:12 PM2019-04-16T18:12:45+5:302019-04-16T18:13:50+5:30

‘कौन बनेगा करोडपती’या कार्यक्रमाच्या अकराव्या सिझनची अगर कोशिश रखोगे जारी, तो केबीसी हॉट सीट पर बैठने की इस बार आपकी होगी बारी ही टॅगलाईन खूपच छान आहे.

Kaun Banega Crorepati 11 registration date out, Amitabh urges fans to participate | कौन बनेगा करोडपतीच्या आगामी सिझनसाठी या दिवसापासून करता येणार रजिस्ट्रेशन...

कौन बनेगा करोडपतीच्या आगामी सिझनसाठी या दिवसापासून करता येणार रजिस्ट्रेशन...

googlenewsNext
ठळक मुद्देसोनी वाहिनीने हा प्रोमो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, अगर कोशिश रखोगे जारी, तो केबीसी हॉट सीट पर बैठने की इस बार आपकी होगी बारी... रजिस्ट्रेशन १ मे पासून सुरू होत आहे. 

हॉट सीटवर आहे फक्त शहेनशहाचे राज्य... शहेनशहा.. अर्थात बिग बी अमिताभ बच्चन.... रसिकांचा सगळ्यात फेव्हरेट शो ‘कौन बनेगा करोडपती’चे अकरावे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची घोषणा नुकतीच करण्यात आली. या सिझनचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन १ मे ला रात्री नऊ वाजल्यापासून करता येणार आहे. या नव्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन प्रेक्षकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसत आहेत. आशा सोडू नका असेही ते म्हणताना दिसत आहेत. 

कौन बनेगा करोडपती’या कार्यक्रमाच्या अकराव्या सिझनची टॅगलाईन देखील खूपच छान आहे. अगर कोशिश रखोगे जारी, तो केबीसी हॉट सीट पर बैठने की इस बार आपकी होगी बारी (तुम्ही सतत प्रयत्न केला तर या वेळी हॉट सीटवर बसण्याची तुम्हाला नक्कीच संधी मिळेल.) या प्रोमोमध्ये गेल्या सात वर्षांपासून या कार्यक्रमात सहभागी व्हायचा प्रयत्न करत असलेल्या महिलेला अमिताभ सल्ला देताना दिसत आहेत. आशा सोडू नका, पुन्हा एकदा प्रयत्न करा... असे त्या महिलेला ते सांगत आहेत. 

सोनी वाहिनीने हा प्रोमो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, अगर कोशिश रखोगे जारी, तो केबीसी हॉट सीट पर बैठने की इस बार आपकी होगी बारी... रजिस्ट्रेशन १ मे पासून सुरू होत आहे. 

अमिताभ बच्चन यांनी देखील हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे ट्वीटरद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते की, मी अमिताभ बच्चन २०१९ मधील एका नवीन अभियानाला सुरुवात करत आहे. कौन बनेगा करोडपती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 



 

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या माध्यामाने साऱ्यांचे तुफान मनोरंजन केले आहे. कौन बनेगा करोडपती या शोमधून अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांना करोडपती बनवले. केबीसीच्या याच प्रश्नाच्या रंगमंचावर छोट्या छोट्या गावातल्या स्पर्धकांची मोठी स्वप्नं साकार होतात. देवीयों और सज्जनो! हे बिग बी अमिताभ बच्चन यांचे हे शब्द पुन्हा एकदा घराघरात घुमणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या या शब्दाने छोट्या पडद्यावर एकच धुमाकुळ घातला होता. आता पुन्हा तीच जादू छोट्या पडद्यावर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे आजवरचे सगळे सिझन गाजले आहेत. त्यामुळे अकरावा सिझन देखील प्रेक्षकांना तितकाच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. 

Web Title: Kaun Banega Crorepati 11 registration date out, Amitabh urges fans to participate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.