मि. बजाजच्या भूमिकेविषयी हितेन तेजवानी सांगतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 11:15 AM2018-09-05T11:15:03+5:302018-09-05T11:16:23+5:30

कसौटी जिंदगी की या मालिकेच्या नव्या सिझनमध्ये पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेत अनुराग, प्रेरणा या भूमिकांइतकीच मि. बजाज ही भूमिका देखील महत्त्वाची आहे.

Kasauti Zindagi Kay 2: After playing Anurag, Hiten Tejwani to play Mr Bajaj? | मि. बजाजच्या भूमिकेविषयी हितेन तेजवानी सांगतो...

मि. बजाजच्या भूमिकेविषयी हितेन तेजवानी सांगतो...

श्वेता तिवारी आणि सीजान खान यांची मुख्य भूमिका असलेली कसौटी जिंदगी की ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा ट्रेलर एकताने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना नवे अनुराग आणि प्रेरणा पाहायला मिळत आहेत. या ट्रेलरमध्ये रोमान्सचा बादशहा शाहरुख खान अनुराग, प्रेरणाच्या प्रेमकथेविषयी सांगताना आपल्याला दिसत आहेत. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. ही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची सगळे आतुरतेने वाट पाहात आहेत. 

कसौटी जिंदगी की 2 या मालिकेच्या नव्या सिझनमध्ये पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेत अनुराग, प्रेरणा या भूमिकांइतकीच मि. बजाज ही भूमिका देखील महत्त्वाची आहे. कसौटी जिंदगी की या मालिकेत ही भूमिका रोनित रॉयने साकारली होती. या भूमिकेमुळे रोनितला छोट्या पडद्यावर खऱ्या अर्थाने एक ओळख मिळाली. ही भूमिका अतिशय सशक्त असल्याने नव्या सिझनमध्ये ही भूमिका कोणता कलाकार साकारणार याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या भूमिकेसाठी इस प्यार को क्या नाम दूँ फेम बरुण सोबतचा विचार केला गेला जात असल्याचे म्हटले जात होते. पण आता बरुण नव्हे तर हितेन तेजवानी ही भूमिका साकारणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून मीडियात चर्चा आहे. पण या केवळ अफवा असल्याचे हितेननेच सांगितले आहे. हितेनने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मी मि. बजाज ही भूमिका साकारणार ही अफवा कोणी पसरवली हेच मला कळत नाहीये. प्रत्येकजण मला याबद्दल विचारत आहेत. मला या मालिकेबद्दल अद्याप तरी विचारण्यात आलेली नाही. त्यामुळे या बातम्या चुकीच्या आहेत. 

कसौटी जिंदगी या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांना 25 सप्टेंबरपासून शुक्रवारी रात्री आठ वाजता स्टार प्लस वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Kasauti Zindagi Kay 2: After playing Anurag, Hiten Tejwani to play Mr Bajaj?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.