Kartika Kamar said, 'Karan Kundra seems to be killed, Karan wants to marry Johar'! | कृतिका कामराने म्हटले, ‘करण कुंद्राला जिवे मारावेसे वाटते, तर करण जोहरशी लग्न करावेसे वाटते’!

टीव्ही इंडस्ट्रीमधील हॉट आणि तेवढीच लोकप्रिय अभिनेत्री कृतिका कामरा सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. कदाचित तुम्हाला माहितीच असेल की, कृतिका आणि करण कुंद्रा बºयाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांचे ब्रेकअप झाले. परंतु या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावे, अशीच त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. परंतु कृतिकाने जे वक्तव्य केले त्यावरून ती पुन्हा करणसोबत नाते ठेवणार याची शक्यता खूपच धूसर आहे. शिवाय तिचे हे वक्तव्य चाहत्यांनाही धक्का देणारे आहे. 

इरा दुबेच्या चॅट शोमध्ये कृतिका कामरा करण वाहीसोबत पोहोचली होती. एका प्रश्नाचे उत्तर देताना तिने एक्स बॉयफ्रेंड करण कुंद्राला जिवे मारण्याची इच्छा असल्याचे म्हटले. त्याचे झाले असे की, कृतिकाला तीन नावे देण्यात आली होती. त्यामध्ये करण कुंद्रा, करण जोहर आणि करण वाही. त्यानंतर कृतिकाला विचारले की, या तिघांपैकी तू कोणाबरोबर लग्न करू इच्छिते? कोणाबरोबर अफेअर ठेवू इच्छिते? आणि कोणाला जिवे मारू इच्छिते? याचे उत्तर देताना कृतिकाने लगेचच करण कुंद्राला जिवे मारू इच्छिते, असे सांगितले. त्याचबरोबर करण वाहीसोबत अफेअर ठेवू इच्छिते तर करण जोहरसोबत लग्न करू इच्छिते, असे तिने म्हटले. यावेळी तिने करणच्या यश आणि रूही या जुळ्या मुलांचा सांभाळ करण्यास तयार असल्याचेही म्हटले. कृतिका कामरा आणि करण कुंद्रा २००९ मध्ये ‘कितनी मोहब्बत है’मध्ये एकत्र बघावयास मिळाले होते. यानंतर हे दोघेही एका ‘नच बलिए’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये बघावयास मिळाले. कृतिका कामरा सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह आहे. 
Web Title: Kartika Kamar said, 'Karan Kundra seems to be killed, Karan wants to marry Johar'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.