Karanvir Vohra's Cute Twins hit the social media | करणवीर वोहराच्या Cute Twins सोशल मीडियावर हिट

सध्या बॉलिवूडमध्ये सगळ्या पॉप्युलर स्टारकिड्स कोण असे विचारले तर आपसुकच तैमुर हे नाव समोर येते. करिनाने तैमुरला जन्म दिल्यापासून त्याच्या प्रत्येक गोष्टीवर मीडियाच्या कॅमे-याची नजर असते. अगदी त्याच प्रमाणे एका  टीव्ही स्टार्सच्या मुलांनीही तैमुरप्रमाणे सा-यांचे लक्ष वेधुन घेतले आहे. फोटोत दिसणा-या या क्युट मुली कोणत्या कलाकाराच्या मुली आहेत असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असणारच.तर या मुली टीव्ही कलाकार करणवीर वोहराच्या जुळ्या मुली आहेत.बेला आणि विएना असे या मुलींची नावं आहेत.अगदी तैमुरप्रमाणेच सोशल मीडियावर या दोघींचे क्युट फोटो पाहून करणचे चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंटस देत असतात. करण त्याच्या मुलींचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असतो. करणवीर वोहराने नुकताच हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तेव्हापासून हा फोटो खूप व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहेत.करणवीरची पत्नी टीजे सिद्धूने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या गोड मुलींना जन्म दिला होता.त्यानंतर टीजे मुलींसह 6 महिने कॅनडामध्येच राहिली आता ती मुलींसह मुंबईत आली आहे.मालिकेच्या शूटिंग दरम्यान करण त्याच्या मुलींना सेटवर घेऊन जातो आणि मालिकेचे सगळे कलाकार मुलींना पाहाताच त्यांच्याबरोबर वेळ घालवताना दिसतात.दोघींना भेटल्याचा आनंद या कलाकारांच्या चेह-यावर साफ दिसून येतो.या दोघींच्या येण्याने सेटवर वेगळाच माहोल तयार होतो.त्यामुळे करणवीरच्या सहकलाकारांना या दोन्ही बाळांचा खूप लळा लागल्याचेही हे कलाकार सांगतात. ही सगळी कलाकार मंडळी बेला आणि विएनाला खास भेटण्यासाठी करणच्या घरी अधूमधून जात असतात. काही महिन्यांपूर्वीच करणने पत्नी टीजे सिद्धू आणि मुलींसह आपले खास फोटोशूट केले होते. त्यातील काही निवडक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते.आता तब्बल 6 महिन्यांनतर पुन्हा आपल्या मुलींसह करणने पत्नी टीजे सिद्धू यांनी खास फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट सोशल मीडियावर अपडेट करताच त्याला खूप चांगल्या प्रतिक्रीया मिळतात.तसेच या फोटोसह करणने या दोघीचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.व्हिडीओ पाहून चाहतेही थक्क होताना दिसतायेत.

(Also Read:असा साजरा केला या कलाकरांनी त्यांच्या मुलांचा पहिला वाढदिवस)
 Web Title: Karanvir Vohra's Cute Twins hit the social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.