Karan Singh Grover also did the same with the actress in marriage | करण सिंग ग्रोव्हरने तीन लग्न करण्यासोबतच या अभिनेत्रीशीही केला होता साखरपुडा

करण सिंग ग्रोव्हरने गेल्या वर्षी अभिनेत्री बिपाशा बासूसोबत लग्न केले. करण लग्न करणार हे लोकांना कळल्यानंतर ट्विटरवर त्याची चांगलीच टर खेचण्यात आली होती. कारण करणचे हे तिसरे लग्न होते. लोकांना एक लग्न करायला मिळत नाही आणि हा सारखाच लग्न करतोय किंवा लग्न करण्याचा हा रेकॉर्ड करणार आहे का? असे अनेक जोक्स नेटिझनने करणवर केले होते. करणने बिपाशासोबत लग्न करण्याआधी श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेट या अभिनेत्रींसोबत लग्न केले होते. श्रद्धा आणि करण यांनी तर अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते. पण श्रद्धासोबत लग्न झाल्यावर काहीच महिन्यात त्याच्या आयुष्यात निकोल अल्वरस आली. निकोल झलक दिखला जा या कार्यक्रमात त्याची कोरिओग्राफर होती. श्रद्धाला हे कळताच तिने लग्नाच्या दहा महिन्यात त्याला घटस्फोट दिला. पण खरी गंमत म्हणजे श्रद्धासोबत लग्न करूनही करण निकोल आणि जेनिफर विंगेट यांना एकत्र डेट करत होता. त्याने श्रद्धासोबत घटस्फोट घेतल्यानंतर जेनिफरशी लग्न केले. जेनिफरसोबत लग्न झाल्यावर काहीच महिन्यात त्याच्या आयुष्यात बिपाशा बासू आली आणि त्याने जेनिफरला घटस्फोट दिला. करणने आजवर तीन लग्न केली आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, तीन लग्नांसोबतच त्याचा एका अभिनेत्रीसोबत साखरपुडा देखील झाला होता. या अभिनेत्रीसोबत त्याने लग्न करण्याचे देखील ठरवले होते. ही अभिनेत्री देखील छोट्या पडद्यावर खूप फेमस आहे.

karan singh grover barkha bisht


ही अभिनेत्री ही बरखा बिष्ट असून ती नुकतीच नामकरण या मालिकेत झळकली होती. बरखा आणि त्याने २००४ मध्ये कितनी मस्त है जिंदगी या मालिकेत काम केले होते. याच मालिकेदरम्यान त्यांचे सूत जमले. अनेक कार्यक्रमात, पार्टींमध्ये ते एकत्र दिसत. दोन वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये त्यांनी साखरपुडा देखील केला होता. पण २००६ मध्ये त्यांनी ब्रेकअप केले. त्यांच्या ब्रेकअपला जेनिफर कारणीभूत होती. जेनिफर आणि करण त्यावेळी कसोटी जिंदगी की या मालिकेत काम करत होते. या मालिकेच्या दरम्यान करण जेनिफरकडे आकर्षित झाला होता. 
बरखा बिष्टने देखील काही वर्षांनी अभिनेता इंद्रनेल सेनगुप्तासोबत लग्न केले. 

Also Read : बेहद फेम जेनिफर विंगेटने करण सिंग ग्रोव्हरसोबतच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
Web Title: Karan Singh Grover also did the same with the actress in marriage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.