बलात्काराच्या आरोपीचा पूजा बेदीने असा केला बचाव! म्हणे, तो असे काही करूच शकत नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 11:49 AM2019-05-08T11:49:45+5:302019-05-08T12:00:32+5:30

पहिल्या पेशीलाच करण सिंह ओबेरॉय ढसाढसा रडला. त्यावेळी करणचे अश्रू पुसणारे कुणीही नव्हते. पण आता अभिनेत्री पूजा बेदी ही मात्र करणच्या मदतीला धावून आली आहे.

Karan Oberoi case: Pooja Bedi, A Band of Boys come out in support of their friend | बलात्काराच्या आरोपीचा पूजा बेदीने असा केला बचाव! म्हणे, तो असे काही करूच शकत नाही!!

बलात्काराच्या आरोपीचा पूजा बेदीने असा केला बचाव! म्हणे, तो असे काही करूच शकत नाही!!

googlenewsNext
ठळक मुद्देअटक केल्यानंतर करणला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीवेळी करण कोर्टातच ढसाढसा रडू लागला.

‘जस्सी जैसी कोई नहीं’ या गाजलेल्या मालिकेतील अभिनेता करण सिंह ओबेरॉय याला गत ६ मे रोजी बलात्कार व ब्लॅकमेलिंगच्या आरोपाखाली अटक केली. पहिल्या पेशीलाच करण सिंह ओबेरॉय ढसाढसा रडला. त्यावेळी करणचे अश्रू पुसणारे कुणीही नव्हते. पण आता अभिनेत्री पूजा बेदी ही मात्र करणच्या मदतीला धावून आली आहे. होय, करण असे काही करूच शकत नाही, असा छातीठोक दावा तिने केला आहे.
करणला मी चांगले ओळखते. तो अतिशय सज्जन, शालीन आणि दयाळू मुलगा आहे. तो असे काही करूच शकत नाही. त्यामुळे करणला नाही तर आरोप करणाºया महिनेला प्रश्न विचारायला हवेत. कारण तिचे आरोप पुर्णपणे अस्पष्ट आहेत, असे पूजा बेदी म्हणाली.
अनेक महिला आपल्या अधिकारांचा चुकीचा वापर करत, पुरुषांवर खोटे आरोप लावतात. एखादी महिला पुरूषांवर खोटे आरोप लावत असेल तर तिला शिक्षा देण्यासाठी काय करता येईल? असा सवालही तिने केला.

कोर्टात रडला करण
अटक केल्यानंतर करणला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीवेळी करण कोर्टातच ढसाढसा रडू लागला. न्यायालयाने त्याला ९ मेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली.

काय आहे प्रकरण
एका महिला ज्योतिषावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली करणलाअटक करण्यात आली आहे. करणने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या महिला ज्योतिषाने केला होता. या प्रकरणी पीडित महिलेने मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत करणला अटक केली आहे.
करणने बलात्काराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलेआणि पैसे उकळले असं पीडित महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करुन चौकशी सुरू केली आहे. आॅक्टोबर २०१६ मध्ये एका डेटिंग अ‍ॅप्लिकेशनद्वारे दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. पीडितेने सांगितल्यानुसार, एक दिवस आरोपीने भेटण्यासाठी त्याच्या फ्लॅटमध्ये बोलावले. येथे आरोपीने लग्नाचे वचनही दिले. यादरम्यान आरोपीने नारळ पाणी दिले होते, ते  प्यायल्यानंतर थोड्याच वेळात तिला चक्कर आली. त्यानंतर आरोपीने बलात्कार केला आणि घटनेचा व्हिडिओही बनवला. त्या व्हिडिओद्वारे आरोपी सातत्याने ब्लॅकमेल करत होता आणि पैसे उकळत होता.

Web Title: Karan Oberoi case: Pooja Bedi, A Band of Boys come out in support of their friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.