करण खन्नाने ‘दिव्य दृष्टी’च्या सहकलाकारांना दिली ही भेटवस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 08:30 PM2019-04-24T20:30:00+5:302019-04-24T20:30:00+5:30

स्टार प्लसवरील ‘दिव्य दृष्टी’ मालिकेतील अभिनेता करण खन्नाने आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

KARAN KHANNA SURPRISES HIS CO-STARS WITH CUSTOMIZED GIFTS ON ‘DIVYA DRISHTI’ | करण खन्नाने ‘दिव्य दृष्टी’च्या सहकलाकारांना दिली ही भेटवस्तू

करण खन्नाने ‘दिव्य दृष्टी’च्या सहकलाकारांना दिली ही भेटवस्तू

googlenewsNext


स्टार प्लसवरीलदिव्य दृष्टी’ मालिकेतील अभिनेता करण खन्नाने आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत तो शिखर या खलनायकाची भूमिका साकारीत असून तो आणि पिशाचिनी (संगीता घोष) हे दिव्या आणि दृष्टी या दोन बहिणींकडील खास शक्ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतात.

शिखर हा दिव्यापुढे नेहमी गोड गोड वागत असे पण तो आणि त्याचे कुटुंबीय हे प्रत्यक्षात या दोन्ही बहिणींच्या विरोधात असतात. पण वास्तव जीवनात मात्र करण खन्ना एक आनंदी व्यक्ती आहे. अलीकडेच त्याने आपल्या सहकलाकरांना खास भेटवस्तू देऊन सुखद आश्चर्याचा धक्का दिला होता.

यासंदर्भात करण म्हणाला, “आम्ही दिवसाचे 12-12 तास एकत्र चित्रीकरण करीत असतो आणि त्यामुळे आम्ही सर्वजण आता एका मोठ्या कुटुंबाचे सदस्य असल्यासारखे झालो आहोत.
माझे प्रत्येकाशी एक खास नाते निर्माण झाले आहे. आमच्यातील मैत्री आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून मी प्रत्येकाला एक खास फोटो फ्रेम भेट दिली.”

या फोटो फ्रेमवर काही सुंदर वाक्ये होती.

उदाहरणार्थ, सोशल मीडियापासून चार हात लांब राहणाऱ्या संगीता घोषला मिळालेल्या फ्रेमवर लिहिले होते, “मैं इन्स्टाग्रामपर नहीं आऊंगी!”

यासारखेच त्याने प्रत्येक सहकलाकाराच्या स्वभावाची वैशिष्ट्ये लक्षात ठेवून त्यांच्या फ्रेमवर अशीच काही रंजक वाक्ये लिहिली होती. अशी फ्रेम मिळाल्यावर प्रत्येकजण खुश झाला आणि करणच्या या भेटवस्तूचे प्रत्येकाने कौतुक केले.

अनेकांनी आपल्याला मिळालेली फोटो फ्रेम आपल्या मेकअप रूमच्या दरवाजावर लटकावून ठेवली.
 

Web Title: KARAN KHANNA SURPRISES HIS CO-STARS WITH CUSTOMIZED GIFTS ON ‘DIVYA DRISHTI’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.