The Kapil Sharma Show: yami gautam was flirted by 10 boys riding bullet in punjab university | The Kapil Sharma Show : पंजाब युनिव्हर्सिटीत यामी गौतम मागे असायचे १० बुलेटवाले!
The Kapil Sharma Show : पंजाब युनिव्हर्सिटीत यामी गौतम मागे असायचे १० बुलेटवाले!

ठळक मुद्दे‘उरी’ या चित्रपटात यामीने एका इंटेलिजन्स आॅफिसरची भूमिका साकारली आहे. ११ जानेवारीला रिलीज झालेला हा चित्रपट ‘सर्जिकल स्ट्राईक’वर आधारीत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ८.२० कोटींची धमाकेदार कमाई केली. विकी कौशलने यात एका भारतीय जवानाची भूमिका साकारली आहे

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता विकी कौशल सध्या ‘उरी’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट प्रदर्शित झालाय. पण अद्यापही चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. काल यामी व विकी दोघेही ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर प्रमोशनसाठी पोहोचलेत. मग काय, हसून हसून पोट दुखले. होय, ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर दोघांनीही धम्माल मस्ती केली. यादरम्यान यामीने कॉलेजच्या दिवसातील काही आठवणीही शेअर केल्यात.
फ्लर्ट करणाऱ्या मुलांना मुली बरोबर ओळखतात, हे खरे आहे का? असा प्रश्न कपिलने यामीला विचारला. यावर यामी खो-खो हसत सुटली. मग काय, कपिलला आणखी तेव चढला. कॉलेजच्या दिवसांत किती मुले तुझ्या मागे असायचे? असा थेट प्रश्न त्याने यामीला विचारला. याला यामीने अगदी सविस्तर उत्तर दिले. होय, १० बुलेटवाले आणि ७ वूफरवाले मुले माझ्या मागावर असायचे, असे यामीने लाजत लाजत सांगितले. मग काय, सेटवर खसखस पिकली. तुझ्यामुळे मुलांमध्ये कधी भांडण झाले का? असा प्रश्नही कपिलने यामील केला. याचे उत्तर मात्र यामी नाही तर विकीने दिले. यामी पंजाब युनिव्हर्सिटीत शिकलीय. येथे मुले आपआपसांत भांडणार नाहीत तर कुठे भांडतील, असे तो म्हणाला.
उरी’ या चित्रपटात यामीने एका इंटेलिजन्स आॅफिसरची भूमिका साकारली आहे. ११ जानेवारीला रिलीज झालेला हा चित्रपट ‘सर्जिकल स्ट्राईक’वर आधारीत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ८.२० कोटींची धमाकेदार कमाई केली. विकी कौशलने यात एका भारतीय जवानाची भूमिका साकारली आहे.


Web Title:  The Kapil Sharma Show: yami gautam was flirted by 10 boys riding bullet in punjab university
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.