Kapil Sharma is saying, this happened due to the firangi flop | ​कपिल शर्मा सांगतोय, या गोष्टीमुळे झाला फिरंगी फ्लॉप

कपिल शर्माला कॉमेडी नाइट विथ कपिल या कार्यक्रमामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांनी अक्षरशः त्याला डोक्यावर घेतले. या कार्यक्रमाने त्याला लोकप्रियता, पैसा सगळे काही मिळवून दिले. या कार्यक्रमानंतर तो प्रेक्षकांना द कपिल शर्मा या कार्यक्रमात पाहायला मिळाला. या कार्यक्रमाला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. पण कपिल आणि त्याची टीम एकदा सिडनीमध्ये शो करायला गेले असता कपिलचे विमानात सुनील ग्रोव्हरसोबत जोरदार भांडण झाले. कपिलने दारूच्या नशेत सुनीलला मारले देखील असल्याचे म्हटले जाते. या गोष्टीनंतर सुनीलने कपिलचा द कपिल शर्मा हा कार्यक्रम सोडला. तर माझ्या व्यक्तिरेखेत आता काही नाविण्य उरले नाही असे सांगत अली असगरने या कार्यक्रमाला रामराम ठोकला. त्यानंतर द कपिल शर्मा शोचा टिआरपी दिवसेंदिवस ढासळतच गेला. त्यातच कपिल सतत आजारी पडत असल्याने या कार्यक्रमाचे चित्रीकरण अनेकवेळा रद्द करावे लागले. यामुळे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी भडकले होते. या सगळ्यामुळे हा कार्यक्रम काही दिवसांच्या ब्रेकवर गेला. द कपिल शर्मा शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यावेळी कपिल त्याच्या फिरंगी या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. 
फिरंगी या चित्रपटाचे कपिलने जोरदार प्रमोशन केले होते. या चित्रपटाच्या प्रमोशनची एकही संधी त्याने सोडली नव्हती. पण तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला. या चित्रपटाच्या अपयशामुळे कपिल डिप्रेशनमध्ये गेला असल्याचे देखील म्हटले जात आहे. कपिलने या चित्रपटाच्या अपयशाचे खापर समीक्षकांवर फोडले आहे. कपिल सांगतो, इंग्रजी शाळांमध्ये शिकलेले काही चार ते पाच पत्रकार एखादा चित्रपट वाईट आहे असे ठरवतात आणि त्याचा फटका त्या चित्रपटाला बसतो. त्यांच्यामुळेच फिरंगीसारखा एन्टरटेनिंग चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाही. समीक्षकांमुळेच फिरंगी या चित्रपटाकडे लोकांनी पाठ फिरवली. 
फिरंगी हा चित्रपट एक आठवडा देखील चित्रपटगृहात टिकू शकला नव्हता. या चित्रपटाकडून कपिलला खूपच अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे कपिलला चांगलाच शॉक बसला आहे. 

Also Read : ​फराह खान का भडकली कपिल शर्मावर?
Web Title: Kapil Sharma is saying, this happened due to the firangi flop
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.