Kapil Sharma reveals why he was rejected several times for marriage | या कारणामुळे कपिल शर्माला मिळायचा लग्नासाठी नकार
या कारणामुळे कपिल शर्माला मिळायचा लग्नासाठी नकार

ठळक मुद्देमला मुलींच्या पालकांकडून विचारण्यात येत असे की, तू काय करतोस त्यावर मी कॉमेडीयन आहे असे मी उत्तर देत असे. त्यावर तू कॉमेडीयन आहे हे आम्हाला कळले. पण पैसे कमवण्यासाठी तू काय करतोस असे ते मला विचारत असत.

कपिल शर्माने काहीच दिवसांपूर्वी त्याची प्रेयसी गिन्नी चतरथसोबत लग्न केले. कपिलने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमापासून केली. या कार्यक्रमात तो स्पर्धक म्हणून झळकला होता. या कार्यक्रमामुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तो कॉमेडी सकर्सच्या अनेक पर्वाचा विजेता ठरला. त्याच्या कॉमेडी नाइट्स विथ कपिल आणि द कपिल शर्मा शो या कार्यक्रमांनी तर प्रेक्षकांना खळखळून हसवले. सध्या द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा दुसरा सिझन प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. कपिलला गेल्या काही वर्षांत चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे आणि त्यातही त्याच्या महिला चाहत्यांची संख्या ही अधिक होती. कपिलच्या लग्नाआधी त्याला मोस्ट एलिजेबल बॅचलर मानले जात होते. पण तुम्हाला माहीत आहे का, कपिलला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जात होते आणि त्यानेच ही गोष्ट त्याच्या द कपिल शर्मा शो मध्ये नुकतीच सांगितली आहे.

कपिलने सांगितले आहे की, मी स्टँडअप कॉमेडीयन असल्याने मला अनेकवेळा मुलींच्या घरातल्यांनी लग्नासाठी नकार दिला. मला मुलींच्या पालकांकडून विचारण्यात येत असे की, तू काय करतोस त्यावर मी कॉमेडीयन आहे असे मी उत्तर देत असे. त्यावर तू कॉमेडीयन आहे हे आम्हाला कळले. पण पैसे कमवण्यासाठी तू काय करतोस असे ते मला विचारत असत आणि मी दिलेल्या उत्तरामुळे त्यांना कधीच समाधान मिळत नसे आणि त्याचमुळे मला अनेकवेळा मुलीच्या घरातल्यांकडून नकार मिळत असे. लोकांना वाटत असे की, माझ्या या कलेमुळे मी माझे घर चांगल्याप्रकारे चालवू शकत नाही. 

द कपिल शर्मा शोच्या होळी स्पेशल कार्यक्रमात आपल्याला अंजुम रहबार, अरुण जेमिनी आणि प्रदीप चौबे हे तीन हास्य कवी पाहायला मिळणार आहेत. कपिलचा हा किस्सा ऐकल्यानंतर अरुण जेमिनी सांगणार आहे की, आजही माझी सासू मला विचारते की, माझा जावई काय करतो असे कोणी मला विचारले तर मी त्यांना काय सांगायचे. 


Web Title: Kapil Sharma reveals why he was rejected several times for marriage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.