जल्द हसायेंगे...! ‘द कपिल शर्मा शो’चा टीजर आला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 02:16 PM2018-11-27T14:16:10+5:302018-11-27T14:16:54+5:30

टीव्हीवरचा स्टार कॉमेडियन कपिल शर्मा परततोय आणि बातमी अगदी पक्कीआहे. होय, प्रेक्षकांना पोट धरून हसवणाºया कपिलच्या नव्या को-या ‘द कपिल शर्मा’ शोचा पहिला वहिला टिझर  प्रदर्शित झालाय.

Kapil to return to TV with a new season of The Kapil Sharma Show | जल्द हसायेंगे...! ‘द कपिल शर्मा शो’चा टीजर आला!!

जल्द हसायेंगे...! ‘द कपिल शर्मा शो’चा टीजर आला!!

googlenewsNext
ठळक मुद्देअख्ख्या भारताला वेड लावणा-या, काही क्षणांसाठी सगळी दु:ख विसरून खळखळून हसवणारा कपिलचा शो म्हणजे, प्रेक्षकांसाठी पर्वणीच. नव्या टीजरमध्येही हेच दाखवण्यात आले आहे.

टीव्हीवरचा स्टार कॉमेडियन कपिल शर्मा परततोय आणि बातमी अगदी पक्कीआहे. होय, प्रेक्षकांना पोट धरून हसवणाºया कपिलच्या नव्या को-या ‘द कपिल शर्मा’ शोचा पहिला वहिला टिझर  प्रदर्शित झालाय. अख्ख्या भारताला वेड लावणा-या, काही क्षणांसाठी सगळी दु:ख विसरून खळखळून हसवणारा कपिलचा शो म्हणजे, प्रेक्षकांसाठी पर्वणीच. नव्या टीजरमध्येही हेच दाखवण्यात आले आहे. अर्थात कपिलचा शो कधीपासून येणार, याचा खुलासा मात्र टीजरमध्ये करण्यात आलेला नाही.



गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून बाहेर पडला आहे आणि छोट्या पडद्यावर परतण्यास सज्ज आहे. याशिवाय एक दुसरी आनंदाची बातमी म्हणजे, कपिल लवकरच लग्न करतोय. १२ डिसेंबरला कपिल गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार. या पंजाबी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अद्याप कपिलने लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण या लग्नासाठी १२ डिसेंबरचा मुहूर्त पक्का असल्याचे कळतेय. पंजाबी रितीरिवाजानुसार हे लग्न होणार आहे.
येत्या १० तारखेपासून या लग्नाचे विधी सुरू होतील. सर्वप्रथम १० तारखेला कपिलच्या बहिणीच्या घरी ‘माता का जागरण’ आहे. यानंतर दुस-या दिवशी संगीत आणि यानंतर मेहंदी होणार आहे. १२ डिसेंबरला कपिल बोहल्यावर चढेल. या लग्नासाठी एक फाईव्ह स्टार हॉटेल बुक करण्यात आल्याचेही कळतेय. १४ डिसेंबरला अमृतसर येथील पंचतारांकित हॉटेलात कपिलचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांसाठी २४ तारखेला मुंबईत दुसरे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.

 

Web Title: Kapil to return to TV with a new season of The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.