Just a bold look or else this beautiful beauty of Shani will make you wounded! | फक्त बोल्ड लूकच नाहीतर शनायाचे हे सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ!

ग्लॅमर दुनियेत कलाकारांना त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलही खूप महत्त्वाची असते.ब-याचदा अभिनेत्री स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी वेस्टर्न लूक असलेले ड्रेसिंग करत असल्याचे पाहायला मिळतं.मात्र रसिका सुनील  या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरल्याचे पाहायला मिळत आहे.ब-याचदा रसिका  वेस्टर्न आऊटफिटमध्ये  पाहायला मिळतेय छोट्या  पडद्यावरील माझ्या नव-याची बायको या मालिकेत शनाया या भूमिकेमुळे तिने रसिकांची मनं जिंकली आहे.तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या ग्लॅमरस लूकचेही चाहते दिवाने आहेत.मात्र रसिकाने केलेल्या फोटोशूटमध्ये  तिला वेस्टर्नपेक्षा पारंपरिक ड्रेसिंग जास्त भावते असे तिच्या फोटोवरून समजते.नेहमीच चाहते अभिनेत्रींचा हॉट अवतार पाहून घायाळ होत असे चित्र पाहायला मिळतं.मात्र रसिकाचा हा साडीतला  फोटो पाहून पण चाहत्यांना घायाळ करण्यासाठी केवळ हॉट लूकच गरजेचा असतो असे नाही.आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच रसिकाच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे.ब-याचवेळी रसिका  सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो अपलोड करत असते. तिच्या या फोटोंनाही तिच्या चाहत्यांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.अगदी त्याचप्रमाणे रसिका सुनीलची एक वेगळी स्टाइल आहे.त्यामुळे तिच्या या फॅशनेबल साडी लूकची रसिकांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळतंय.
Also Read:शनायाला डेंग्यूची लागण,रुग्णालयात उपचार सुरु

मालिकेतही बिनधास्त, धम्माल मस्ती आणि जीवनाचा फुलऑन आनंद घेणारी शनाया रसिकांना भावते. त्यामुळे माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. ही व्यक्तिरेखा रसिका सुनील साकारत असून या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेत शनायाच्या भूमिकेसाठी आधी शर्मिला राजारामला विचारण्यात आले होते. पण तिने या भूमिकेसाठी नकार दिल्याने या भूमिकेसाठी रसिकाची निवड करण्यात आली.माझ्या नव-याची बायको ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालली आहे. मालिकेचं कथानक, त्यात दिवसागणिक येणा-या ट्विस्ट रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. विशेषतः राधिका-शनायाची जुगलबंदी आणि दोघींमध्ये अडकलेल्या गुरुनाथची होणारी फजिती यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिकांमध्ये माझ्या नव-याची बायको मालिकेचा समावेश आहे. 
Web Title: Just a bold look or else this beautiful beauty of Shani will make you wounded!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.